मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते ; बारी समाजाच्या कार्यक्रमात सौ. दीप्ती बारी यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/08/2026

मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते ; बारी समाजाच्या कार्यक्रमात सौ. दीप्ती बारी यांचे प्रतिपादन

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

          मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते ; बारी समाजाच्या कार्यक्रमात सौ. दीप्ती बारी यांचे प्रतिपादन 

         मुलांची स्वप्न पूर्ण करण्यात स्वतःची स्वप्न विसरू नका. स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने  जपा आणि त्यांचा पाठलाग करा. आपण करत असलेले प्रयत्न बघून मुलांना प्रेरणा मिळते. थोडी जरी असली तरी दररोजच्या जगण्यात प्रगती महत्वाची आहे. जे नको त्याचा जास्त विचार करतो आणि ते नेमके घडते म्हणून काय नको यापेक्षा काय हवे याचाच अधिक विचार करावा. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत प्रश्न विचारायला शिकले पाहिजे, असे सांगत मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते, असा सल्ला प्रसिद्ध समुपदेशक सौ. दीप्ती बारी (जळगाव) यांनी दिला.

          चोपडा येथील बारीवाड्यात श्री समस्त सूर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ चोपडा, नागवेल मित्र मंडळ व बारी समाज महिला मंडळातर्फे आयोजित गुणगौरव समारंभात बोलत होत्या. यावेळी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय बारी, पंच मंडळाचे अध्यक्ष लोटन बारी, उपाध्यक्ष राजेंद्र बारी, सचिव जगन बारी, गणेश बारी, सौ उषा बारी हे उपस्थित होते.

         यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण, सुंदर हस्ताक्षर, सामान्यज्ञान, वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय बारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वसंत नागपुरे यांनी केले. कार्यक्रमास समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तर महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागवेल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp