चोपडा (प्रतिनिधी) : - -
दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयामध्ये 'पालक सभा' संपन्न
आज महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयामध्ये इयत्ता 11 वी वर्गाची पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सदर प्रसंगी जवळ-जवळ 150 पालकांनी उपस्थिती दर्शवली. संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ स्मिता संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालक सभेचे आयोजन करण्यात आले. सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ संध्या सोनवणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभल्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील व ना.कै. अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एन. बोरसे व डॉ. डी. ए. तायडे यांनी केले. सदर प्रास्ताविकात बोरसे यांनी महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा मांडताना महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या IAS, IPS, Doctors, Engineers यांची नावांसह माहिती करून दिली. तसेच आपल्या महाविद्यालयातील IIT दिल्ली या ठिकाणी निवड झालेला विद्यार्थी प्रथमेष गुरुदास पाटील, हिमांशु बोरसे, जयदीप प्रवीण बावा यांच्या बद्दल माहिती करून दिली. तसेच योगेश मयूर बारेला (VNIT) नागपूर, आर्यन भरतकुमार सपकाळ (IIIT पुणे), तेजस माळी (CET-99.62) PICT Pune, जामरा पीयूष जिकालाल (NEET-499) या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल सर्वांना माहिती करून दिली. तसेच डॉ. डी. ए. तायडे यांनी महाविद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा जसे CET, JEE, NEET यांबद्दल माहिती दिली. बी.जे. पाटील यांनी CET, JEE, NEET, VIT, IISER या परीक्षांबद्दल POWERPOINT PRESENTATION च्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले. सदर प्रसंगी उपस्थित पालकांमधून गोपाल भिका पाटील, प्रसाद श्रीकृष्ण कुलकर्णी, निकिता दिनेश कदम, कविता भूपेंद्र पाटील, गायत्री अजित पाटील, दीपिका मुकेश महाजन, सीमा पराग सोनार यांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमा बद्दल आणि भविष्यात विद्यार्थ्यांना ज्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे आहे त्या परीक्षांची जी तयारी महाविद्यालयात शिक्षकांकडून केली जातेय याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. संध्या एम. सोनवणे यांनी स्व-जीवनातील अनुभवावरून पालक म्हणून आईची भूमिका काय असली पाहिजे याबद्दल महिला पालक वर्गाला उद्बोधित केले. तसेच पालक म्हणून शिक्षकांची आणि पालकांची जबाबदारीचीही जाणीव करून दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए.एन. बोरसे सर्व प्राध्यापक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रणजित एन. पाटील यांनी केले व आभार श्रीमती सविता एस. पारडे यांनी मानले.
WhatsApp
No comments:
Post a Comment