चोपडा शहरात 5 व्या दिवशी गणरायाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न ; मिरवणूक मार्गाची न. पा.तर्फे स्वच्छता मोहीम..... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/09/2026

चोपडा शहरात 5 व्या दिवशी गणरायाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न ; मिरवणूक मार्गाची न. पा.तर्फे स्वच्छता मोहीम.....


चोपडा (प्रतिनिधी) : - -

          चोपडा शहरात 5 व्या दिवशी गणरायाचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न ; मिरवणूक मार्गाची न. पा. तर्फे स्वच्छता मोहीम.....

       चोपडा शहरात मागील 5 दिवसांपासून सुरू असलेला गणेशोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव व उत्साहाच्या वातावरणात पार पडला. गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस विभाग व चोपडा नगरपरिषद प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. तसेच गटारींवर आवश्यक ठिकाणी ढापे ठेवण्यात आले होते. तापी पुलावर तसेच चहार्डी खदान येथे गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभतेने करता यावे यासाठी बॅरिकेडिंग व क्रेनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून नगरपरिषद कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोपडा शहर पोलीस निरीक्षक यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
         तसेच चोपडा नगरपरिषदेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणपती विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली होती. सोबतच निर्माल्य संकलनाकरीता छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, आशा टॉकीज येथे याठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. काल दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी चोपडा शहरातील नागरिकांनी जड अंतःकरणारे गणरायाला निरोप दिला विविध गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. चोपडा शहरातील तमाम गणेश मंडळे, मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व गणेशभक्तांचे स्वागत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी बाजार पेठेत केले व चोपडा नगरपरिषदेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणरायाचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवर नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील, नगरसेविका सौ. नेहा जैन, आरोग्य सभापती श्री. रमेश शिंदे, मुख्याधिकारी विवेक धांडे तसेच नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांच्या हस्ते गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा नारळ, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सौ. नम्रता पाटील यांनी चोपडा शहरातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धनाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

          गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान चोपडा शहराची ओळख असलेल्या ‘गुलाल किंग’ परंपरेनुसार गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण केली. त्यामुळे मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात गुलाल जमा झाला होता. या प्राश्वभूमीवर भूमीवर मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी 4 वाजेपासून मिरवणूक मार्गाची साफसफाई सुरू करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 ते 119 सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील गुलाल व इतर कचरा संकलित करून ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूक केली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे 12 ते 13 ट्रॉली गुलाल संकलित करण्यात आला व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी चोपडा शहरातील नागरिकांना पुढील वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे व मिरवणुकी दरम्यान गुलाला ऐवजी फुलांचा वापर करण्यात यावा तसेच ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी, असे आवाहन केले.
         गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांसाठी नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये उपमुख्याधिकारी संजय मिसर, करअधीक्षक संदिप गायकवाड, करनिरीक्षक प्रणव पाटील, विद्युत अभियंता प्रमोद पाटील, नगर अभियंता डिगंबर वाघ, पा.पु. अभियंता जितेंद्र मोरे, स्वच्छता निरीक्षक वसंत राठोड, दिपाली साळुंके, जयेश भोंगे, लेखापरीक्षक चेतन गडकर, लेखापाल मयुर शर्मा, मिळकत व्यवस्थापक संजय ढमाळ, नगर रचनाकार चेतन अहिरराव, शहर समन्वयक स्वप्निल धनगर तसेच स्वच्छता विभागातील मुकादम व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. चोपडा नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनबद्ध उपाययोजना, अधिकारी-कर्मचारी यांचे परिश्रम तसेच गणेश मंडळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp