भीमाशंकरच्या कुशीत घाव! 'विकासा'साठी 32 हजार झाडांचा बळी.... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

30/10/2026

भीमाशंकरच्या कुशीत घाव! 'विकासा'साठी 32 हजार झाडांचा बळी....


         कलाकृती : आर्टिस्ट अनिलराज पाटील, 

                          चोपडा, जि. जळगाव

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         भीमाशंकरच्या कुशीत घाव! 'विकासा'साठी 32 हजार झाडांचा बळी....

         चोपडा येथील चित्रकार अनिलराज पाटील यांनी आपल्या कुंचल्यातून हाच आक्रोश मांडला आहे. त्यांच्या चित्रात एक शेकरू (भारतीय रानखार) तोडलेल्या झाडाच्या रक्ताळलेल्या बुंध्याकडे हताशपणे पाहतोय, बाजूला फुटलेली अंडी पडली आहेत आणि पानांपासून बनलेला एकच शब्द आहे - "विकास" हा केवळ चित्राचा विषय नाही, तर आजचं सत्य आहे.

         पुणे-रायगडच्या सीमेवर असलेल्या भीमाशंकरच्या शेजारच्या कर्जत - सैडोंगर जंगलात 32,490 वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इथे टॉरंट पॉवर कंपनीचा 3000 मेगावॅट, 13,505 कोटी रुपयांचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प येत आहे. सरकारचे म्हणणे आहे की हा प्रकल्प अभयारण्या पासून 16 किमी बाहेर आहे आणि कोणतीही बेकायदेशीर तोड झालेली नाही. पण पर्यावरण प्रेमी विचारत आहेत - पश्चिम घाट हा UNESCO वारसा आहे, इथे महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू राहतो, त्याचे घर पानांवर आहे, जमिनीवर नाही. झाडे तोडली तर तो जाणार कुठे ?

          दि. 3 नोव्हेंबरला भूमिपूजन होणार असल्याने घाईघाईने झाडे हटवण्याचे पत्र समोर आल्याने हा वाद पेटला आहे. विरोधानंतर सध्या वृक्षतोड तात्पुरती थांबवली आहे. महाराष्ट्र आधीच दुष्काळाने होरपळतोय. झाडे गेली तर पाऊस कुठून येणार? या चित्रातील खारुताई आज प्रत्येक वन्यजीवाचा प्रश्न विचारतेय - हा कोणता विकास 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp