चोपडा (प्रतिनिधी) : - -
चोपडा नगर परिषधेच्या सफाई व पाणी पुरवठा कामगारांचा वेतनचा तिढा सुटला....
महाराष्ट्र पालिका कामगार-कर्मचारी संघटना (सी.आय.टी.यू. संलग्न) च्या वतीने चोपडा नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील सफाई महिला कामगार आणि पाणी पुरवठा विभागातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या महिन्यांचे वेतन अदा न केल्यामुळे तसेच इतर कायदेशीर मागण्या प्रलंबित राहिल्याने आज दि. 28/10/2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्याचा होते. चोपडा नगर परिषदेच्या सफाई व पाणी पुरवठा कामगारांचे वेतन गेल्या 5 ते 6 महिन्यापासून थकीत होते 8 दिवसांवर दिवाळी सण जवळ आला असुन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या दिवाळी सण कसा साजरा करावयाचा असा मोठा गहण प्रश्न पडला होता. ठेकेदार तसेच संबधित अधिकाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी वारवांर मागणी करण्यात आली होती. तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केले म्हणून आज दि. 28 ऑक्टोबर पासून नगर परिषधेच्या गेट वर, छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले होते. तरी यावेळी सत्ताधारी पक्षाच्या न पा पदाधिकारी यांनी पाठ फाईवली व कोणीही आले नसल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला.
त्यावेळी आंदोलन स्थळी भा ज पा नगरसेवक व पत्रकार यांनी भेट दिली असता या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे गाराने मांडले त्याची दखल घेत विरोधी पक्षाचे गजेंद्र जयस्वाल (भा ज पा - गटनेता), सौ. संध्या महाजन (भा ज पा महिला जिल्हाध्यक्ष व नगरसेवक), महाराष्ट्र 7 न्युज चे मुख्य संपादक - राजेंद्र पाटील, तसेच नगरसेवक नरेंद्र पाटील, नगरसेवक शरद पाटील, नगरसेवक तिलक शहा, सामाजिक कार्यकर्ते नरेश महाजन, मितेश भावसार यांनी सदर कॉट्रकचे ठेकेदार भरत देशमुख व न पा प्रशासनाचे उपमुख्याधिकारी मिसर यांना बोलावून मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याशी फोन वर चर्चा घडवून आणली व चर्चे अंती महिला कर्मचाऱ्यांचा आजच 2 महिन्याचा पगार अदा करण्यात आला व पुरुष कर्मचाऱ्यांचा 2 महिन्याचा पगार उद्या देण्यात येईल आणि दिवाळी अगोदर 1 महिन्याचा पगार देण्यात येणार आहे.
अश्या आश्वासना नंतर न. पा. विरोधी पक्ष नगरसेवक, पत्रकार बांधव, प्रशासनातर्फे मुख्याधिकारी विवेक धांडे, उपमुख्याधिकारी मिसर व ठेकेदार भरत देशमुख यांच्या मध्यस्थीतीने कंत्राकी कामगारांचा तिढा संध्याकाळी 7 वाजता सोडविण्यात यश आले.
WhatsApp
No comments:
Post a Comment