चोपड्यात नवरात्री उत्सव, वाहनोत्सव व उद्या रथोत्सव उत्सहात साजरा होणार.... - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/10/2026

चोपड्यात नवरात्री उत्सव, वाहनोत्सव व उद्या रथोत्सव उत्सहात साजरा होणार....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

           चोपड्यात नवरात्री उत्सव, वाहनोत्सव व उद्या रथोत्सव उत्सहात साजरा होणार....

           चोपडा येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे शेकडो वर्षांची परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव दि. 11 ते 23 ऑक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानच्या विश्वस्तांनी दिली. चोपड्याच्या या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या या महोत्सवाला 11 तारखेपासून वहनोत्सवाने सुरुवात होणार आहे. वहनोत्सव दररोज धार्मिक विधीनंतर व्यंकटेश बालाजीच्या जयघोशात वाजत गाजत रात्री 9 वाजेनंतर मंदिरापासून वहन निघेल. यात 11 तारखेला हत्तीचे वहन असून त्याचा मार्ग गांधी चौक, बाजारपेठ असा असेल. तर 12 तारखेला चंद्राचे वहन असून त्याचा मार्ग मोठा देव्हारा, गणेश कॉलनी, तर 13 तारखेला सिंहाचे वहन असून त्याचा मार्ग अरुणनगर, श्रीराम नगर, 14 तारखेला मोराचे वहन गुजर अळीत जाईल, 15 तारखेला नागोबाचे वहन सुंदरगढीत गेले, 16 तारखेला गरुडाचे वहन जबरेराम मंदिर व भाटगल्लीत गेले, 17 तारखेला मारुतीचे वहन बडगुजर गल्लीत गेले, 18 तारखेला सूर्याचे वहन पाटील गढीत व मल्हारपुरा येथे गेले, 19 तारखेला वाघाचे वहन गुजराथी गल्लीत गेले, 20 तारखेला दसऱ्याच्या दिवशी घोड्याचे वहन बाजारपेठत, तर 21 तारखेला आज बत्तीस पुतळे चे वहन गांधी चौक, बाजारपेठ या मार्गावरुन गेले.
        श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात सुप्रसिद्ध असलेला व एकादशीला साजरा रथोत्सव उद्या दि. 22 व 23  ऑक्टोबरला होणार आहे. दि. 22 रोजी सकाळी 10 वाजता गोलमंदिरा जवळील श्री बालाजी मंदिरा पासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल. आशा टॉकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर मार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल मारुती मंदिरा जवळ रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी रथ मुक्कामी राहिल. तर दि. 23 रोजी रथाच्या परतीच्या प्रवासाला मारुती मंदिरा पासून सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिरा जवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल.

         या रथोत्सव काळात शहरात 2 दिवसाची रथयात्रा ही भरते. तसेच नवरात्र उत्सवची सांगता अर्थात देवींच्या विसर्जनाची मिरवणूकही मोठ्या भक्तीभावाने निघते शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिक बहुसंख्येने सहभागी होऊन या धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp