विज्ञानत्रम टेक्नॉलॉजी आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन वेबिनार सत्राचे आयोजन..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

29/01/2022

विज्ञानत्रम टेक्नॉलॉजी आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन वेबिनार सत्राचे आयोजन.....

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

      विज्ञानत्रम टेक्नॉलॉजी आणि पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन वेबिनार सत्राचे आयोजन.....

    चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल व विज्ञानत्रम टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या भारतातील सर्वात मोठ्या  वेबिनारचे आयोजन केले. विद्यार्थांनी सर्व क्षेत्रात पारंगत होऊन यश संपादन करावे, नैपुण्य मिळावावे, आज युग तंत्रज्ञानाचे आहे , भविष्य रोबोटिक्सचे आहे तसेच सोशल मीडियावर होणारी फसवणूक यासंबंधीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे. विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात त्याने प्रगतशील असावे असा मानस पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादासो डॉ. सुरेश पंडित बोरोले यांचे आहे व नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी शिकावे आत्मसात करावे. यासाठी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात सक्षम बनण्यासाठी संचालक तथा रोटरी क्लब अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा विविध कार्यक्रम राबवत असते.

        सध्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय नाही व बराच वेळ विद्यार्थ्यांकडे आहे, तर या मिळालेल्या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन करून माहिती देण्यात यावी  यासाठी या वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले. हे वेबिनार विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.

                 इयत्ता तिसरी ते पाचवीच्या

        विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणात रोबोटिक्स

                इयत्ता सहावी ते आठवीसाठी

          सायबर फसवणूक पासून सुरक्षित कसे

                  इयत्ता नववी ते बारावीच्या

 विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अंमलबजावणी

    अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.या वेबिनार च्या आयोजनासाठी प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक किरण चौधरी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ह्या चर्चासत्रासाठी शुभम कुमार आयआयटी दिल्ली यांनी मार्गदर्शन केले...




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp