चोपडा (प्रतिनिधी) :--
वडगाव बु. आरोग्य केंद्रात 30 वर्षावरील वक्तींची NCD शिबिरात रोज होते तपासणी ....
वडगाव बु. येथे दिनांक-12 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी मनरेगा च्या कर्मचारी यांचे तापी किनारी स्मशानभूमीवर 30 वर्षावरील 29पुरुष तर 9 महिला यांचे NCD स्क्रीनिग करण्यात आले, त्यात प्रत्येकाचे उच्चरक्तदाब, नाळीचे ठोके मोजण्यात आले, व रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन चे प्रमाण, तसेच वजन, उंची देखील घेण्यात आली,आरोग्य सेवक-विजय देशमुख यांनी नियमित सकस आहाराचे सेवन कसे करावे, नियमित व्यायाम व सोबत प्राणायाम देखील करावा, शरीर निरोगी तर आपणांस कोणतेही आजार होऊ शकत नाहीत असे सर्व उपस्थितांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन,सल्ला दिला सर्वांचेच रक्तदाब साधारण निघाला,त्यातील 3 व्यक्तींचे साखरेचे थोडे प्रमाण वाढलेले असल्याने त्यांना त्वरित पुढील तपासणी साठी अडावद आरोग्य केंद्रात संदर्भित करण्यात आले.हे NCD शिबिर यशस्वीतेसाठी आरोग्य सेवक-विजय देशमुख व CHO-भुषण देशमुख,आरोग्य सेविका-उज्वला परदेशी, आशा सेविका-वैशाली पाटिल, अनिता निळे,अर्धवेळ परिचारिका-वंदना साळुंखे यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच-कडु बारकू कोळी, उपसरपंच-नामदेव पाटिल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदीचे विशेष सहकार्य लाभत आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment