चोपडा (प्रतिनिधी) :--
राष्ट्रीय बालपरिषद ... मुलांचा अधिकार तंबाखूमुक्त शाळा , तंबाखूमुक्त गाव ...
सलाम मुंबई फाऊंडेशन, विविध उपक्रमांच्या माध्यमातून, भारत देशातील युवकांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या या कार्याला महाराष्ट्र सरकारचा सक्रीय पाठिंबा लाभला असून सरकारही तंबाखूमुक्त शाळांचे ध्येय १०० टक्के साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र राज्यातील ३४ ग्रामीण जिल्ह्यात १ लाख १० हजार ३०० शाळांसोबत सुरु केलेला आहे. आजमितीस तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील १,३६,८८४ शिक्षक आणि ३०२५८ स्थानिक अधिकारी आणि भागधारकांना प्रशिक्षित करण्यात आले असून ५९३ सेवाभावी संस्था देखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. ह्या कार्यक्रमाचे साध्य म्हणून आजमितीस महाराष्ट्र राज्यात एकूण ३८,९३१ शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत. ह्या कार्यक्रमास प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य , पोलीस, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग यांचे खूप सहकार्य , मिळत आहे. आजमितीस हा कार्यक्रम १० राज्यामध्ये (महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, मध्य्प्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगल, उत्तराखण्ड, आंध्रप्रदेश, बिहार) १००२६४ शाळांसोबत सुरु आहे. सलाम मुंबई फाउंडेशनच्या तंबाखू नियंत्रणावर सुरु असलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने घेतली असून महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संस्थेला प्रदान केला आहे.
तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि सम्पूर्ण जगामध्ये भारत देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत. तंबाखू हि इतर सर्व रोगांची जननी आहे. आज सम्पूर्ण भारत देशात २८. ६ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करत आहेत तर आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६. ६ टक्के आहे . मुलांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास ५. १ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत आणि आपल्यासाठी हि चिंतेची बाब आहे.
आमचा असा विश्वास आहे की ‘मुल हे समाजातील बदलाचे प्रतीक आहेत. आणि आम्ही असे अनुभवले आहे की मुलांच्या पुढाकारातून, शिक्षक आणि इतर भागधारक पुढे येतात आणि शाळा तंबाखूमुक्त करण्यात सहभागी होतात. तंबाखू नियंत्रणाच्या क्षेत्रात तरुण चॅम्पियन म्हणून मुलांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी, यासाठी आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल परिषद मंच स्थापन करण्याचा विचार केला. बालपरिषद हे असे व्यासपीठ आहे ज्याठिकाणी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवून, त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करून एक व्यासपीठ निर्माण केले जाते. ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतः: तंबाखूमुक्त निरोगी जीवन जगून त्यांच्या शाळेत, आणि गावात तंबाखूमुक्त आरोग्यदायी जीवन जगण्याचा सर्वांना संदेश देतात. बालपरिषदेमधील मुलांचा प्रत्यक्ष सहभाग संपूर्ण भारतातील तंबाखूमुक्त शाळा अभियानाला बळ देईल आणि समाजात शाश्वत बदल घडवून आणेल. बालपरिषदेच्या माध्यमातून मुलांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून देऊन तंबाखूमुक्त शाळा अभियान शालेय आणि गाव स्तरावर सक्षम होईल
महाराष्ट्र राज्यात शालेय पातळीवर तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम सक्षम व्हावा याहेतूने राज्यस्तरीय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा, तंबाखूमक्त गणेशोत्सव, तंबाखूमक्त आरोग्य संपन्न शाळा चित्रफीत निर्मिती कार्यक्रम, ३१ में जागतिक तंबाखू विरोधी कार्यक्रम ह्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन गावागावात तंबाखूमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रयत्नातूनच प्रत्येक जिल्ह्यात यंग लीडर्स तयार झालेले आहेत जे आज आपापल्या जिल्ह्यात तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न शाळा आणि तंबाखूमुक्त गाव निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. ह्या यंग लीडर्सने, यंग लीडर्स साठी सुरु केलेली एक मोहीम म्हणजे बालपरिषद होय. हे सर्व विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्याचे नेतृत्व करत असून शाळेत आणि गावात तंबाखू विषयी सकारात्मक बदल व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. बालपरिषदेमध्ये उपस्थित विद्यार्थी सबंधित विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांना आलेले अनुभव सांगणार आहेत तसेच प्रश्न देखील विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे सबंधित अधिकारी विद्यर्थ्यांना देणार आहेत. बालपरिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शाळांनी शिक्षण विभागाने पारित केलेल्या ०९ निकषांची पूर्तता करावी हा संदेश जाईल आणि महाराष्ट्रातील सर्व शाळा मार्च २०२२ पर्यंत तंबाखूमुक्त व्हाव्यात असे आवाहन करण्यात येईल. ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य हे तंबाखूमुक्त शाळांचे राज्य म्हणून जाहीर करण्यात येईल.
या ऑनलाइन बालपरिषदेस महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यामधून 3७५ विद्यार्थी आणि १७५ शिक्षक सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील बालपरिषद प्रमुख उपस्थिती माननीय अजितदादा पवार (माननीय उपमुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य )
कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित राहतील
मा. श्री. दिनकर टेमकर , मा. संचालक प्राथमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र , मा. डॉ. पद्मजा जोगेवार सह-संचालक आरोग्य विभाग, महाराष्ट्र , मा. डॉ. एस.एन. ढोलपुरीया सह-संचालक, आरोग्य विभाग,, राजस्थान मा. श्री. शशिकांत केकरे सह आयुक्त एफडीए विभाग, महाराष्ट्र मा. डॉ. अर्चना ओझा (राज्य कर्यक्रम अधिकारी, एनटीसीपी ) आरोग्य विभाग, उत्तराखंड मा. श्री. विजयकांत सागर उप-आयुक्त, मीरा भायंदर विभाग, पोलीस विभाग, महाराष्ट्र मा. श्री. सतीश त्रिपाठी राज्य सलाहाकार एनटीसीपी आरोग्य विभाग, उत्तरप्रदेश मा. श्री. विशाल पाटील आऊटपुट एडिटर लोकशाही चॅनेल , महाराष्ट्र
WhatsApp
No comments:
Post a Comment