चोपड्यात शिरोमणी श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न... समाज भूषण व समाज रत्न पुरस्कार प्रदान ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/02/2022

चोपड्यात शिरोमणी श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न... समाज भूषण व समाज रत्न पुरस्कार प्रदान ...

 

चोपडा (प्रतिनिधी ) :--

    चोपड्यात शिरोमणी श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न... समाज भूषण व समाज रत्न पुरस्कार प्रदान ...

     चोपडा येथील सोनार समाज संत नरहरी फौंडेशन चोपडा यांच्या वतीने शिरोमणी श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त पालखीचे पूजन करून गुजराती वाडीमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज व शिरोमणी संत नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमा पूजन केले. व  समाजातील इयत्ता दहावी, बारावी व उच्च शिक्षणात नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत, किर्तीवंत, विद्यार्थी अंकिता विनोद सोनार, आकाश नितीन अहिरराव ,देवयानी भरत सोनार, तेजश्री अरुण विसपुते यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले. नक्षत्र ज्वेलर्स चे संचालक नितीन पंढरीनाथ अहिरराव यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ कै.पंढरीनाथ कृष्णा अहिरराव स्मरणार्थ मानाचा

                    समाज भूषण पुरस्कार

    दिनानाथ जीवनलाल निकुंभ ( सोनार ) निवृत्त डी.वाय.एस.पी यांना सक्रिय समाजकार्य करिता देण्यात आला. तर कोविड-१९ च्या काळात स्वतःच्या जीवाचा विचार न करणारे कोविड योद्धे, ज्यांनी सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल        

                   समाज रत्न पुरस्कार

    राकेश राजकुमार विसपुते, प्रकाश नामदेव पिंगळे,यशवंत गोपाळ जडे, नितीन पंढरीनाथ अहिरराव, दिनेश छोटूलाल मोरे,निलेश भिकाशेठ दुसाने, करिष्मा राजेंद्र सोनार, तेजश्री अरुण विसपुते, सीमा शेखर भामरे,मानसी मनोज सोनार यांना देऊन गौरविण्यात आला. याप्रसंगी सर्व समाज बंधू भगिनींनी श्री मुकुंदा भोजू सोनार व परिवाराकडून देण्यात आलेल्या स्नेहभोजनचा आनंद घेतला.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष विलास माधवराव सोनार, उपाध्यक्ष नितीन पंढरीनाथ अहिरराव, सचिव डॉ. विजय अशोक जाधव, खजिनदार रवींद्र भालचंद्र वानखेडे , अनिल सुभाष वानखेडे ,रवींद्र मुरलीधर विसपुते, भटू रामभाऊ विसपुते, मुकुंदा भोजू दुसाने  ,श्याम देविदास सोनार ,श्रीराम पुरुषोत्तम सोनार, भूषण मनोहर बागुल, राकेश राजकुमार विसपुते ,रोहित रमाकांत सोनार यांच्यासह अजिंक्य वानखेडे, गोपाल जडे, अॅड.अशोक जाधव ,प्रदीप सोनार, अॅड. आर.एन.सोनार, प्रकाश जाधव, श्याम आबा सोनार ,राजेंद्र सोनार ,गौरव सोनार, दत्तात्रय विसपुते, स्नेहल पोतदार ,महेंद्र अहिरराव, राजेंद्र विसपुते, अतुल सोनार, गजानन पोतदार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास सर्व समाज बंधू भगिनी कोविड-१९ चे सर्व नियम पाळत मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजय जाधव यांनी केले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp