कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ए टी एम परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2022

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ए टी एम परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
   कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ए टी एम परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन
    कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात ए टी एम परिवाराचे दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगर येथे संपन्न होत आहे.या राज्यस्तरीय साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी बालभारतीच्या किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक व साहित्यिक किरण केंद्रे तर स्वागताध्यक्षपदी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची निवड करण्यात आल्याची माहिती ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र परिवाराचे राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांनी दिली आहे. 
   राज्यात प्रत्येक जिल्ह्यात  कृतिशील शिक्षकांचा समूह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सर्वांगीण विकास होण्यासाठी नेहमी  अविरतपणे कार्य करत आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ए टी एम परिवारमार्फत राज्यात विविध  प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.त्यासाठी ए टी  एम परिवाराच्या वतीने राज्यातील शिक्षकांना विविध उपक्रमातून मार्गदर्शन करून प्रेरणा दिली जाते. प्रेरणा द्या व प्रेरणा घ्या , आपण सर्व एक आहोत  या सेवाभावी वृत्तीने राज्यात ए टी एम परिवार नेहमी कार्य करत आहे.या उपक्रमापैकी एक उपक्रम म्हणजे शिक्षकांचे राज्यस्तरीय साहित्यसंमेलन होय.
    विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.शालेय जीवनात शिक्षणाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे.उद्याचे साहित्यिक , लेखक ,विचारवंत ,शिक्षणतज्ञ विद्यार्थ्यांमधून निर्माण होणार आहेत.त्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळणे गरजेचे असते . शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ए टी एम परिवाराच्या वतीने दरवर्षी शिक्षकांसाठी साहित्यसंमेलनाचे आयोजन केले जाते.यावर्षी हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ऐतिहासिक नगरी म्हणजे अहमदनगर शहरात २७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे . या संमेलनासाठी राज्यातील शिक्षक येणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ए टी एम परिवाराचे मार्गदर्शक व  साहित्यिक किरण केंद्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून किरण केंद्रे यांचे अभिनंदन केले जात आहे.किरण केंद्रे हे पुणे येथे पाठ्यपुस्तक मंडळात किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
   किरण केंद्रे यांची याशिक्षक साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ए टी एम परिवाराचे प्रमुख  राज्य संयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विक्रम अडसूळ सर ,सहसंयोजक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्योती बेलवले , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नारायण मंगलारम ,ज्ञानदेव नवसरे ,उमेश कोटलवार, जळगाव जिल्हा संयोजक राकेश विसपुते यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp