चोपडा (प्रतिनिधी) :--
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त विशेष... कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून बनला आरोग्यदूत
कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्याला मिळालेले बोनस आयुष्य व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियानसाठी समर्पित करणारे व व्यसनमुक्ती अभियानात महाराष्ट्रात नावलौकिक मिळवणारे चोपडा शहराचे सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर,जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान ब्रॅण्ड एम्बेसेडर
कॅन्सर ज्याचा नाव ऐकून भल्या भल्याची भांभेरी उडते व परिवार उध्वस्त होऊन जाते मृत्यू चा दाढेत रुग्ण जातो पैसा ही जातो आणि रुग्णाचा नातेवाईकांना मानसिक त्रास पण सहन करायला लागतो आणि रुग्ण वाचेल की नाही याची शाश्वती नसते ,पण कॅन्सर सारखाय जीवघेण्या आजारावर हिमतीने मात होऊ शकते व कॅन्सरला कॅन्सल केले जाऊ शकते असेच जीवंत उधारहरन आज जागतिक कॅन्सर दिना निमित्त व्यसन मुक्ती अभियानात राज्यात नावलौकिक मिळवणारे चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व आरोग्यदूत राज मोहम्मद खान शिकलगर यांचा बाबतीत देता येईल
राज मोहम्मद यांना 2010 मध्ये तंबाखू ,गुटखा चा व्यसन मुळे तोंडाचा कॅन्सर झाला होता त्यांना निदान उशिराने झाल्याने आजार वाढला होता. नातेवाईक , मित्रपरिवार राज मोहम्मद साठी प्रार्थना करत होते मृत्यू ला जवळ बघून आणि आपल्या कडून झालेली चूक ज्याचा मुळे पूर्ण परिवार उध्वस्त होण्याचा मार्गावर होते नातेवाईक ,व मित्रमंडळी ची जिव वाचविण्यासाठी धडपड बघून राज मोहम्मद ला पश्चाताप होत होता ते रडून अल्लाह कडे जीवनाची भीक मागत होते. अल्लाह मला भिक्षेत आयुष्य दे जे चूक माझा कडून झाली दुसऱ्या कडून होणार नाही त्या साठी माझा आयुष्य समर्पित करेन व कॅन्सरग्रस्तांना योग्य असा मार्गदर्शन करेन अल्लाह ने त्यांची रडून केलेली प्रार्थना ऐकली व भिक्षेत आयुष्य बोनस म्हणून दिले ,2012 पासून त्यांचा संघर्षमय जीवनाची नवीन पारी सुरू झाली त्यांनी केलेली प्रतिज्ञा अनुसार महिनीतील 12 दिवस कॅन्सरग्रस्त लोकांची मदद व मार्गदर्शन साठी आणि ज्याचा मुळे कॅन्सर सारखा जीवघेण्या आजारात जकडलो त्या तंबाखू, गुटख्याची ची नायनाट करण्यासाठी राखीव ठेवले ऊन ,पाऊस, थंडी असो राज मोहम्मद दिलेल्या शब्दाला बांधील राहिले एक भाग पूर्ण कापला गेला असताना सुद्धा रुग्णाने घरून आणलेला डब्यात त्याचा सोबत जेवण करून त्यांना जीवन जगण्यासाठी उतेजना ,व हिम्मत देतात मि जगू शकतो तुमचा सोबत येऊ शकतो तर तुम्हीही या आजारावर मात करून आपल्या परिवार सोबत चांगला जीवन जगू शकतात असे समुपदेशन करतात आता पर्यंत राज मोहम्मद खान शिकलगर यांनी 800 च्या वरती कॅन्सर रुग्णांना मदद, योग्य असा मार्गदर्शन केले आहे त्यांचा कॅन्सर पेशनट हेल्प सेंटर द्वारे मदती चे जाळे जळगाव, धुळे ,नंदुरबार , नाशिक, मुंबई, ठाणं, पुणे, औरंगाबाद सातारा, सांगली ,परभणी, बुलडाणा, अकोला ,सोलापूर, रायगड , महाड, अहेमदनगर, नागपूर,व इतर जिल्ह्यात व मध्यप्रदेशात पसरले आहे. इतके जिल्ह्यातील रुग्णांना मदत व मार्गदर्शन केले आहे त्याच्यातून भरपूर रुग्ण कॅन्सर सारखाय जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या परिवारा सोबत जीवन सुखसमाधाने जगत आहेत.
तंबाखू गुटखा विरोधी अभियान राबवत असताना राज मोहम्मद याने आपली भावी पिढी व्यसनमुक्त कशी करता येईल या साठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत ,ते आता शिक्षणविभाग महाराष्ट्र राज्य आरोग्यविभाग , सलाम मुंबई फौंडेशन ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा च्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळा करण्या साठी धडपड करत आहेत आता जिल्हा महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे या अभियानात राज मोहम्मद शिकलगर यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब, जिल्हा शल्यचिकित्सक तत्कालीन डॉ एन, एस, चौहान साहेब ,नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ किरण पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया साहेब ,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे साहेब, शिक्षणाधिकारी विकास पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी चौहान मॅडम , जिल्हा आरोग्यधिकारी , महानगरपालिका आयुक्त ,अन्न भेसळ विभाग उपायुक्त ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण चे जिल्हा सल्लागार डॉ नितीन भारती सर सलाम मुंबई फौंडेशन चे संजय ठाणगे साहेब, जयेश माळी साहेब, सलाम मुंबई चे जळगाव जिल्हयाचे समनव्यक संदीप खरात साहेब ,जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष चे राहुल ब्राहाटे, प्राची मॅडम ,निशा कटरे मॅडम, उपशिक्षणधकारी , सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी अधिकारी ,सर्व तालुका आरोग्यधिकारी ,विस्ताराधिकारी ,तज्ञशिक्षक ,सर्व केंद्रप्रमुख , सर्व मुख्यध्यपक ,सर्व शिक्षक बंधू ,भगिनी चे व जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे.
राज मोहम्मद जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे सदस्य आहे जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त अभियान चे जिल्हा ब्रॅण्ड एम्बेसेडर आहे जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियान चे मार्गदर्शक आहे ,जन मानवता बहुउद्देशीय संस्था चोपडा चे अध्यक्ष ,कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर ,कॅन्सर पेशनट पुनर्वसन केंद्र चे संचालक आहे आता पर्यंत 350चा वरती लोकांना व्यसनमुक्त केले आहे व 1500 शाळा तंबाखू मुक्त केले आहे राज मोहम्मद आपल्या संस्था द्वारे ,रमजान, व दीपावली हे दोन मोठे सण कॅन्सर ग्रस्त परिवारला रेशन किट देऊन साजरा करतात कॅन्सर ग्रस्त परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात ,कॅन्सर ग्रस्त परिवारातील मुलींचं लग्नकार्यात साहित्य देऊन मदद करतात त्यांचा पुढचा संकल्प कॅन्सर पेशनट सुधार केंद्र उघडायचा आहे कॅन्सरचा अवघड उपचारा नंतर त्यांचं विश्रांती व मनोधैर्य वाढविण्यासाठी त्या केंद्रात रुग्णांना सर्व सुविधा पुरविले जाणार सर्वाना राज मोहम्मद आव्हान करतात जीवन फार सुंदर व अनमोल आहे आपल्या परिवारासाठी राखीव ठेवा व्यसनाच्या नादि लागून आपले सुंदर आयुष्य उध्वस्त करु नका कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे आहारी जाऊ नका व्यसनमुक्त परिवार सुखी परिवार
आज जागतिक कॅन्सर दिना निमित्ताने या सामाजिक कार्यकरत्याला आरोग्यदूतला देवाने अजून जीवनदान द्यावे हीच त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा
S महाराष्ट्र 7 न्युज व चोपडा न्युज
परिवाराकडून जागतिक कॅन्सर दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
WhatsApp
No comments:
Post a Comment