राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम- फेब्रु.२०२२ - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

25/02/2022

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम- फेब्रु.२०२२

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम- फेब्रु.२०२२
   चोपडा तालुका अंतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही दिनांक २७ फेब्रु. २०२२ रोजी शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येणार असून, तालुक्यात एकूण ३१०८४ लाभार्थी असून, त्यापैकी ग्रामीण भागात २२९५९ तर शहरी भागात ८१२५ लाभार्थी आहेत. सदर पोलिओ लसीकरणा करिता तालुक्यात एकूण १९३ बूथ कार्यान्वित असून, पैकी ग्रामीण भागात १६१ तर, शहरी भागात ३२ बूथ कार्यान्वित असणार आहेत. सदर मोहीमेच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील एकूण 535 कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून, ग्रामीण भागात ४४४ तर शहरी भागात ९१ कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी काम पाहणार आहेत, त्यासाठी तालुका आरोग्य विभागाने सर्व तयारी केलेली आहे.
   त्याचप्रमाणे ग्रामीण भागात  दिनांक १, २ व ३ मार्च पर्यंत एकूण ३ दिवस तर शहरी भागात २८ फेब्रू. ते ०४ मार्च पर्यंत एकूण ५ दिवस घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.सदर पल्स पोलिओ मोहिमेसाठी तालुक्याची टास्क फोर्स ची मिटिंग माननीय तहसीलदार अनिल गावित सो. यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ फेब्रु.२०२२ रोजी घेण्यात आली असून, सदर बैठकीस म.गटविकास अधिकारी, म. मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, गट शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
     सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात व्यापक जनजागृती केली असून, पोस्टर्स, बॅनर्स, भित्तीपत्रिका, तसेच सर्व स्तरावर प्रशिक्षण देखील घेण्यात आलेले असून, मोहिमेसाठी तालुका आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली  आहे.अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.

              मुख्य संपादक  :-- राजेंद्र पाटील 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp