मुक्ताईनगर येथे “भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/02/2022

मुक्ताईनगर येथे “भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) कैलास कोळी :--

   मुक्ताईनगर येथे “भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

    येथे मुक्ताईनगर वारियर संघ, मुक्ताई क्रिकेट संघ, स्वराज क्रिकेट संघ, एदलाबाद क्रिकेट संघ, मॉर्निंग ११ संघ द्वारा आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन. प्रथम सामना एकता क्रिकेट संघ वराड ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव संघा दरम्यान खेळण्यात आला. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी नियमित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे. प्रथम सामना खेळणाऱ्या दोन्ही संघांना त्यांनी सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी खेळपट्टी तयार करणारे गणेश घटे, बबलू बोदडे, सादिक खान यांच स्वागत करण्यात आलं. या स्पर्धेच्या आयोजनासाठी स्माईलिंग स्टोन फाउंडेशन व पाचपांडे मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने प्रथम बक्षीस डॉ.श्री. प्रविण दादा पाचपांडे यांनी ३३,३३३रुपये तर द्वितीय बक्षीस श्री जगदंब हॉस्पिटलचे डॉ.श्री.ललित पाटील सर तसेच निर्भय चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉ. श्री. निखील अभय जैस्वाल व गोरे हॉस्पिटलचे डॉ.श्री.मिलिंद गोरे यांच्या तर्फे २२,२२२ रुपये बक्षीस देण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये केवळ ३२ संघांना प्रवेश मर्यादित करण्यात आलेला आहे.


     यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या समवेत माजी सरपंच तथा नगरसेवक ललितभाऊ महाजन, डॉक्टर श्री.प्रवीणदादा पाचपांडे, डॉ.ललित पाटील, डॉ. सचिन चौधरी, डॉ.अमोल चौधरी, डॉ.विक्रांत जैस्वाल, डॉ.निखिल अभय जैस्वाल, डॉ.मिलिंद गोरे, डॉ.वायकोळे, रवी तायडे सर, मुक्ताई क्लासेसचे संचालक योगेश राणे सर, अविनाश नाईक सर, रोहन अग्रवाल, सरदार सर, श्रीकांत पाटील, सोपान पाटील, आशिष भंसाली, सचिन सुरपाटणे, अभय भंसाली, डॉ.कृष्णा गायकवाड, उमेश पाटील, मोहन कोळी, करण पथरोड, भोला तेजी, साईम खान, शाहरुख खान, नरेंद्र शिर्के सर आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp