धरणगाव येथे बालिकावर झालेल्या अत्याचार विरोधात चोपडयात आंदोलन पीडित परिवारा साठी न्यायाची मागणी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/02/2022

धरणगाव येथे बालिकावर झालेल्या अत्याचार विरोधात चोपडयात आंदोलन पीडित परिवारा साठी न्यायाची मागणी ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    धरणगाव येथे बालिकावर झालेल्या अत्याचार विरोधात चोपडयात आंदोलन पीडित परिवारा साठी न्यायाची मागणी ... 
    दि.20 फेब्रुवारी2022 रोजी धरणगाव येथे सहा व आठ वर्षाच्या बालिकांवर चंदुलाल शिवराम मराठे नामक नराधमाने अत्याचार केला. त्या अत्याचारी नराधमांचा निषेध करण्यासाठी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा तसेच चोपडा तालुक्याच्या वतीने समस्त तेली समाजातर्फे पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले.चोपडा तहसील कार्यालयासमोर 23 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या आंदोलनात अति जलद गती न्यायालयात सदरचा खटला चालवण्यात यावा व अत्याचारी नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागण्यांसह पिडीत कुटुंबाला संरक्षण द्यावे, दोन्ही बालकांचा भविष्यातील शिक्षणाचा खर्च शाशनाने करावा,भविष्यात दोन्ही बालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, तसेच प्रत्येक बालिकेच्या नावावर प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली.अशाच प्रकारच्या जोरदार घोषणा देऊन नराधमाचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल कुमार गावित यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी .चौधरी, चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, चोपडा तालुका महिला अध्यक्षा सीमा सुनील चौधरी, उपाध्यक्षा योगिता शशिकांत चौधरी,चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी.एम.चौधरी, विश्वस्त नारायण चौधरी, देवकांत चौधरी,सुनील चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश चौधरी,आबा चौधरी,राजू चौधरी,गोपीचंद चौधरी,सुनील चौधरी अनेक समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार गावित यांनी वरिष्ठांकडे मागण्यांचे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp