चोपडा येथे सात दिवशीय निःशुल्क योग शिबीर... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

23/02/2022

चोपडा येथे सात दिवशीय निःशुल्क योग शिबीर...

चोपडा  (प्रतिनिधी ) :--
      चोपडा येथे सात दिवशीय निःशुल्क योग शिबीर...
       मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगांव  अंतर्गत सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी च्या एम ए योगिक सायन्स अभ्यासक्रम अंतर्गत योग शिक्षिका गायत्री रविंद्र शिंदे यांचे सात दिवशीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. हिरालाल मोतीलाल करोडपती माध्यमिक विद्यालय चोपडा येथे दि. २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर शिबिराची वेळ सकाळी ५:३० ते ६:३० असणार आहे.
     योग शिक्षिका सौ गायत्री शिंदे यांना डॉ देवानंद सोनार ( संचालक - सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी , जळगाव ) , प्रा. पंकज खाजबागे , प्रा. गीतांजली भंगाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तरी सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त साधकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज