विवेकानंद विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/02/2022

विवेकानंद विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ...


 चोपडा (प्रतिनिधी ) :--

    विवेकानंद विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ...

    चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयातील ओवी राधेशाम पाटील  या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, प्रिन्सिपल सुरेखा मिस्तरी, बालवाडी विभाग मुख्याध्यापिका माधुरी भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी केले. विद्यालयातील चौथी ची विद्यार्थिनी सृष्टी नरेंद्र महाजन व इंग्लिश मीडियम चा विद्यार्थी जयदीप सतीश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी अ चा विद्यार्थी नक्षत्र कापुरे यांनी पोवाडा सादर केला. उपशिक्षक अभिषेक शुक्ल व इंग्रजी विभागाच्या उपशिक्षिका योगिता अंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी प्रकाश झोत टाकत साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली.


     त्यानंतर विद्यालयातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विभागाचे सर्व शिक्षक , कर्मचारीवृंद ,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक जितेंद्र देवरे यांनी केले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp