लतादीदींच्या सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील .... योगेश चौधरी. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/02/2022

लतादीदींच्या सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील .... योगेश चौधरी.

 

चोपडा (प्रतिनिधी) :--

    लतादीदींच्या सूर अन् त्यांचं योगदान हे नेहमीच चिरंतर आठवणीत राहील .... योगेश चौधरी.

    पंकज प्राथमिक विद्यालयात स्व. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली...

     लतादीदींच्या जाण्याने कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून आकाशातील एक दैदिप्यमान तारा निखळला आहे. लतादीदींचा सूर आणि त्यांचं योगदान हे नेहमीच आठवणीत राहील अशा भावना व्यक्त करत चोपडा येथील पंकज विद्यालय प्राथमिक येथे स्व लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

     योगेश चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की, लता दीदींच्या आवाज,सादरीकरण यामुळे शास्त्रीय संगीतात आवाजाचा पोत ,लालित्य भाव अशा गोष्टींकडे कलाकार अधिक लक्ष देऊ लागले होते .स्वरांची अचूकता ,गोडवा ,शब्दांचे उच्चारण इत्यादींच्या त्या कलागुरू होत्या .त्यांचे स्वर सर्वच वयोगटातील कलाकारांना साम्य व्हायचे . त्यांनी चाळीस हजाराहून अधिक गाणी गायली. त्यांच्या सूर कायम अजरामर राहील अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

    सदर श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील, पंकज कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे ,योगेश चौधरी ,सी आर चौधरी ,डी एम जैस्वाल, आर डी पाटील ,गायत्री शिंदे ,जयश्री पाटील ,धनश्री जावळे, प्रियंका पाटील, मनोज अहिरे, प्रशांत पाटील, महेश गुजर ,प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकुर, सचिन लोखंडे ,मयुर पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर पाटील, सईद शेख ,दिलीप बाविस्कर ,संदीप पाटील, कैलास बोरसे ,प्रमोद पाटील ,रवी शार्दुल आदींनी परिश्रम घेतले....




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp