बारा किलो गांजा सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/02/2022

बारा किलो गांजा सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
     बारा किलो गांजा सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश ...
    चोपडा शहर व तालुक्यात गुटखा, गांजा यासह गावठी कट्टे यांच्यावर सतत धडक कारवाई होतच असते. दि.२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानकात एका टपरी जवळ बारा किलो गांजा सह तीन आरोपींना जेरबंद करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे.सविस्तर वृत्त असे की, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा बसस्थानकातील एका टपरीजवळ तीन इसम अवैधरित्या गांजा बाळगून आहेत .सदर इसमांची खात्री केली असता त्यांच्याजवळ तपकिरी रंगाच्या बॅगेत बारा किलो आठशे ग्रॅम वजनाचा सुमारे ६४००० रुपये किमतीच्या गांजा आढळून आला तसेच ६००० रुपये किमतीचे तीन मोबाईल आढळून आले व तपकिरी रंगाची बॅग आढळून आली असा एकूण ७०२०० रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे.
     सदर कारवाईत विक्की विनोद झंवर ( वय २८ ) रा.गुजरवाडा भोकर ता. जि. जळगाव, मनवेल मार्टिन म्हस्के ( वय ३३) रा. संजय गांधी नगर, ओ टी सेक्शन, रेल्वे स्टेशन जवळ ,उल्हासनगर २ ठाणे, जितेंद्र रवींद्र महाजन ( वय ३०)  रा. सानेगुरुजी नगर, स्टेशन रोड, उल्हासनगर ४ ठाणे या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
     पो.हे.कॉ.विलेश सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात भाग ६ सीसीटीएनएस  ६२/ २०२२ एन डी पी एस १९८५ चे कलम ८, २० ,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे प्र.पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp