दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

01/03/2022

दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
        दुबई येथील आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी श्री अनिलराज पुनमचंद पाटील यांचे चित्र अखेरच्या फेरीसाठी पात्र ...
     चोपडा  सुप्रसिद्ध कलाकार श्री अनिलराज पुनमचंद पाटील यांच्याचित्राची INTERNATIONAL PAINTING COMPETITION -"Sankatmochan" (आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन संकट मोचन) दुबई येथील ऑनलाइन प्रदर्शनसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील नामवंत कलाकारांच्या चित्राची निवड झालेली आहे.
    विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात सलग चौथ्यांदा त्यांच्या विविध कलाविष्काराची निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली. त्यात हार्मनी इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन , ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृति चित्रप्रदर्शन, रेनबो आर्ट वर्ल्ड दिल्ली द्वारा आयोजित मेटॅफर या जगविख्यात संस्थांच्या प्रदर्शनात निवड झालेली आहे. 
    वरील स्पर्धेत त्यांनी पूर्णाकृती श्री महाबली हनुमान या बलबुद्धी देवताचे हुबेहूब चित्र स्टीपलींग आर्टस् शैलीत निर्माण केले आहे. प्रभू श्री रामचंद्रांना अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन त्यांची सेवा करणारे पवनपुत्र 
श्री हनुमंताच्या चित्रासाठी खालील चौपाई वर आधारित चित्र साकारले आहे.
भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र के काज संवारे ।।
लाय सजीवन लखन जियाये l श्रीरघुबीर हरषि उर लाये ।।
  अनिलराज पाटील यांना त्यांचे गुरू ख्यातनाम चित्रकार चंद्रशेखर कुमावत  (पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
  या धवल यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून व राज्य कला अकादमीचे कलाकारांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

3 comments:

  1. अनिलराज, मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Bhavu tuzi aabhada yevdi paragati hovo hich mazi prarthna aahe marutila .....I proud to be my big bro & my friend

    ReplyDelete
  3. Your best wishes from manoj pawar

    ReplyDelete

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp