जळगाव जिल्ह्यातील प्रिंटींग क्षेत्रातील राम गेला... त्यांच्या स्मृती शेष आठवणीने डोळे पाणावतात -- अनिलकुमार पालीवाल
खरोखरच म्रुत्यु हा माणसाला आपल्या अस्तित्वात बाधा आणतो,असे म्हणतात. पण अस्तित्वाची जाणीव करून देत आपल्या जीवनाचा म्रुत्यु हा शेवटच्या टप्प्यात आपल्याला नेऊन ठेवतो. त्यानंतर आपली ईच्छा असूनही आपण काही करु शकत नाही. असेच आमच्या जवळपास अर्धा शतकाच्या मैत्रीला एक आदर्श कौटुंबिक एकतेची झालर त्यांनी आपल्या मैत्रीतून निर्माण करीत अचानक निघून गेले... राम उर्फ यशवंत उखाजी बोंडे. प्रिंटींग क्षेत्रातील अग्रगण्य नाव... परफोरेशन मशीन च्या पिनपासून तर ट्रेडल मशीन पर्यंत सारं काही एकच दुकानात आम्हाला मिळत असे. निव्वळ नफा कमवण्यासाठी व्यवसाय करत नव्हते, आमचे अण्णा.... तर व्यवसायातून घट्ट मैत्रीची जोपासना करून जीवनात अनेकांना वाट दाखवण्यात अण्णांना समाधान मिळत असे. सर्व क्षेत्रात अण्णांनी आपला मित्र परिवार उभारला. परिवाराची ज्येष्ठत्वाची भूमिका थक्क करणारी आहे. जे त्यांना सोडून गेले तेच एक दिवस त्यांच्या जवळ आले.कारण त्यांच्या स्पष्ट व मिलनसार स्वभावाने ते सर्व परीवाराच्या आत नारळाच्या गुणधर्मामुळे वरून टणक व आतून गोडवा निर्माण करणारा त्यांच्या म्रदु स्वभावाचे अनेकांनी गैरफायदेही घेतल्याचे पाहिले आहे. असो. परिवाराचे अग्रणी म्हणून त्यांना अनेक वेळा संकटातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत असे.धंद्यात स्वतःच्या पायावर उभे राहिले.भांडवल शुन्य.... शुन्यातून विश्व निर्माण करतांना होणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करत,परिवाराची जबाबदारी पार पाडत,लहान चारही मुलांना सुसंस्कृत व सुशिक्षित व धंद्यात क्षमताप्रधान बनवण्यासाठी ह्या सज्जन व्यक्तिमत्त्वाने कधीही वाममार्गाला प्राधान्य दिले नाही. प्रिंटींग क्षेत्रात कार्यरत त्यावेळचे त्यांचे सहकारी बाळ पुराणीक ह्यांना अण्णा नेहमीच आदरपूर्वक सन्मान देत त्यांना आदर्श मानत.माता पित्याच्या सेवेत रामभाऊ सोबतच आमच्या रत्ना वहिनी देखील नेहमी कार्यमग्न असत.समाजसेवा व ग्राहक सेवेत त्यांना नेहमी समाधान मिळत असे.अद्रष्य सेवाभावी व्रत्तीने अण्णा कधीच पडद्यावर न येता जीवनभर कायम आपल्या कार्यात मग्न राहिले.
अलीकडे अर्धांगवायू व अन्य आजाराने त्यांना घेरले ,आणि अण्णांचा अंथरुणावर प्रवास सुरु झाला. तरीही स्वस्थ बसले ते अण्णा कसले...त्यांच्या चंचल स्वभावाने ते आपल्या मित्रांना व आप्तेष्टांना सततच्या संपर्कात राहून हालचाली व इतर सर्व गोष्टी विचारपूस करित. असे पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावरील हरहुन्नरी व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआड झाले असले तरी त्यांच्या स्मृती शेष आठवणीने सतत डोळे पाणावतात...स्व.अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली....

No comments:
Post a Comment