वडोदा वन क्षेत्रामध्ये गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/03/2022

वडोदा वन क्षेत्रामध्ये गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात ...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी
     वडोदा वन क्षेत्रामध्ये गावठी दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणात ...
वडोदा वन क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर नांदवेल डोलारखेडा, रिगाव थेरोळे बोदवळ या क्षेत्रामध्ये गावठी दारूच्या हातभट्ट्या लावलेले आहेत,या वन विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी व वन मजूर याच्या आशीर्वादाने बऱ्याच वर्षापासून दारू वाल्यांनी आपले कारखाने वन विभागाच्या हद्दीत  मध्ये सुरू केलेले आहेत मात्र यांच्यावर अद्यापही कुठली प्रकारच्या कारवाई झालेले नाहीत
 कारवाई का झालेली नाही? याचे कारण मात्र गुलदस्त्यात मध्ये आहे गावठी दारू पाडण्यासाठी लागणारे लाकडे त्याच ठिकाणी मिळत असल्यामुळे पाणी  सुद्धा उपलब्ध आहे या सुविधेमुळे त्यांनी आपले ठाण मांडून बसलेले आहेत या व्यवसायिकांना वन विभागाचे पूर्ण सहकार्य असल्याचे बोलले जात आहे पोलीस विभागा सोबतच आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे या कारणामुळे वन विभागाचे कर्मचारीअधिकारी यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यास तयार नाहीत
        वडोदा वनक्षेत्र विभागाचं कार्य क्षेत्र पूर्णा नदीच्या काठापर्यंत गेलेले आहे पूर्णा नदी ही दोन्ही जिल्ह्यांचा बॉर्डर आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाची गावठी दारू कारखान्यावर वरती करडी नजर असल्यामुळे त्या परिसरामध्ये गावठी दारूचे कारखाने नाहीत  याचा फायदा मुक्ताईनगर तालुक्यातील गावठी दारूचे गाडणं करणारे दारू तयार करून विदर्भात सुद्धा पोहोचविण्याचे काम करीत आहे.त्यामुळे दारूचे धंदे तेजी मध्ये असल्याचे बोलले जात आहे या गावठी दारू मध्ये स्पीरिट चा वापर म्हशीचे इंजेक्शन अन्य साहित्याचा वापर करून तयार करतात या दारू सेवनामुळे नागरिकांना पोटाचे विकार जडलेले आहेत घरामध्ये सुख-समृद्धी नांदत नाही संसार उध्वस्त होत आहे याला जबाबदार कोण? प्रशासन की? राजकीय पदाधिकार की पक्षाचे कार्यकर्ते? एक नाही अशा अनेक आईचे संसाराचं उध्वस्त ला कोण कारणीभूत?
   अशा आईच्या हाकेला कोण पुढे येणार हा मात्र काळच सांगेल या प्रकारावर पोलीस प्रशासनाने व वनविभागाने या प्रकाराला आळा घालण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp