औरंगाबादचे संभाजीनगर करायला काय अडचण आहे ? जगन्नाथ बाविस्कर
औरंगाबादचे नांव बदलून संभाजीनगर करणे ही मूळ संकल्पना शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती.जसा भाजपाने श्रीराम मंदिर बनवण्याचा संकल्प केलेला होता तसा शिवसेनेने सुध्दा औरंगाबादचे संभाजीनगर करणे असा चंग बांधला होता.सत्ता येताच भाजपाने आपली वचनपूर्ती करताना अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माणकार्य सुरू केलेले आहे.तसे शिवसेनेची सत्ता असताना औरंगाबादचे संभाजीनगर करायला काय अडचण आहे ?असा खडा सवाल सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकान्वये उपस्थित केला आहे.
औरंगजेबाच्या सैनिकांनी धर्मवीर संभाजी महाराज यांना धर्मांतरासाठी अनेक मरणयातना दिल्या होत्या.परंतु त्यांनी "मी धर्माँतर करणार नाही",अशी ठाम भूमिका घेऊन त्यावेळी धर्मासाठी बलिदानही दिलेले होते.औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठीची सर्व पूर्तता ४ मार्च २०२० रोजीच पूर्ण झालेली असतांना ह्यावर्षीच्या ११ मार्चला धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून मान्यता देणे गरजेचे होते.परंतु तसे न होता विधानसभेत या मागणीला सत्ताधाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे विरोधकांसह शिवसेनेच्या काही धर्मप्रेमी आमदारांनी सुध्दा "धर्मवीर संभाजी महाराज की जय", "जय भवानी जय शिवाजी", "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले होते.यावेळी सत्तेतील कॉंग्रेस मंत्र्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर केले तर काय होईल ?असा प्रतिप्रश्न करून एक प्रकारे या मागणीला विरोधच केलेला आहे.सत्ताधारी महाविकास आघाडीत शिवसेना हा प्रमुख पक्ष असतांना औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण का होत नाही? सरकार शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांची पूर्तता करू शकत नाही का? शिवसेना ही सत्तेतील कळसुत्री बाहुले बनली आहे का ? संभाजीनगर नावाला राष्ट्रवादीचा विरोध आहे का ? असेही सुचक प्रश्न धर्मप्रेमी जगन्नाथ बाविस्कर यांनी उपस्थित केले आहेत.

No comments:
Post a Comment