ग्राहकांनी काळजीपूर्वक व जागृत राहून खरेदी केली पाहिजे -- तहसीलदार अनिल गावित - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/03/2022

ग्राहकांनी काळजीपूर्वक व जागृत राहून खरेदी केली पाहिजे -- तहसीलदार अनिल गावित

चोपडा (प्रतिनिधी) :--
    ग्राहकांनी काळजीपूर्वक व जागृत राहून खरेदी केली पाहिजे  --  तहसीलदार अनिल गावित
    ग्राहकांनी काळजीपुर्वक आणि सजग राहून खरेदी केली पाहीजे.सध्या लोकांकडे पैसा आहे पण वेळ कमी यामुळे धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करतांना सजग बनून आपला हक्क तसेच केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाईन खरेदी व भ्रामक जाहिरातींव्दारे ग्राहकांच्या  होणाऱ्या फसवणूकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यां पर्यंत पोहोचवून जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अनिल गावित यांनी  जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमांत केले.
     ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत असतात या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस 'जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधत चोपडा महसुल विभागातर्फे तहसील कार्यालयाच्या नविन प्रशासकीय  इमारतीच्या सभागृहामध्ये ऊत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमांच्या अद्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे प्रबोधन मंत्री विकास जोशी होते. 
     कार्यक्रमांत ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, विकास जोशी, उदयकुमार अग्निहोत्री, राजेश खैरनार आदींनी ग्राहक चळवळीच्या ध्येय धोरण आणि उदिष्टांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अनिल गावित ,ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे तालुका अद्यक्ष योगेश भिमराव महाजन चहार्डी , ग्राहक पंचायतीचे तालुका अद्यक्ष राजेश खैरणार, ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे संघटक कैलास महाजन,कार्याद्यक्ष समाधान माळी, शहराध्यक्ष सौ.संध्या महाजन, उपाद्यक्ष यशवंतराव बोरसे,अनिलकुमार पालिवाल, जितेंद्रकुमार शिंपी ,ग्राहक पंचायतीचे प्रबोधनमंत्री विकास जोशी, जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन कैलास महाजन यांनी तर आभार प्रदर्शन प्रभारी पुरवठा अधिकारी देवेंद्र नेटकर यांनी केले. कार्यक्रमांत प्रधानमंत्री उज्वला गँस योजना संदर्भात माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp