धूलिवंदंनेच्या दिवशी वर्डी येथे सुकनाथ बाबांचा समाधी चैतन्य महोत्सव पार पडणार .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/03/2022

धूलिवंदंनेच्या दिवशी वर्डी येथे सुकनाथ बाबांचा समाधी चैतन्य महोत्सव पार पडणार ....

वर्डी - चोपडा (प्रतिनिधी) :--
     धूलिवंदनेच्या दिवशी वर्डी येथे सुकनाथ बाबांचा समाधी चैतन्य महोत्सव पार पडणार .....
     धूलिवंदनेच्या दिवशी फाल्गुन वद्य पाडव्याला म्हणजेच दि.20/3/1935 ला बाबांनी जिवंत समाधी घेतली आहे त्या निमीत्त गावात हा चैतन्य महोत्सव पार पडत असतो.बाबांचे शिष्य गुरु रेवानंद स्वामी महाराज यांनी ह्या उत्सवाची सुरुवात केली होती. तो समाज एकरुप करण्याचा विचार घेउन आजही ही परंपरा दरबाराचे मठाधिपती श्री दिनानाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य नेमाने सुरु आहे.
     दोन वर्षापासून कोरोणाच्या  महामारी मुळे शासनाच्या आदेशामुळे भंडारा संपन्न झालेला नव्हता आजपर्यंत एवढ्या वर्षापासून चालत असलेल्या बाबांचा भंडारा हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे व संपन्न होत आहे परंतु कोरोणामुळे लोकांवर  प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दोन वर्षापासून भंडारा झालेला नव्हता तरी यावर्षी बाबांचा भंडारा संपन्न होणार त्यामुळे सर्व गावात आनंदाचे व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, बाबांचा भंडारा म्हणजे जणू काही घरोघरी दिवाळीसारखे वातावरण निर्माण झालेले असते प्रत्येक घरातील व्यक्ती ही आवर्जून भंडारा साठी आलेलीच असते.
  !! महाप्रसाद वरण , बट्टी व वांग्याची भाजी !!
       बट्टी भाजायला गोऱ्या आणण्यासाठी गावातील तरुण मंडळी चार दिवसापासून जंगलात जाऊन गोवऱ्या आणण्याचे काम करीत असतात. गावातील सर्व मंडळी आपापल्या परीने भंडारा साठी मदत करीत असते जवळपास 150 क्विंटल गहू वेगवेगळ्या  गिरण यांवर  पाठवून  दोन दिवस आधीच गहू दळण्याचे काम चालू होत असते. कार्यक्रमासाठी गावातील सर्व समाजाचे बांधव गावातील आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतात ,हे या भंडार्‍याच्या पुण्यतिथीनिमित्त आगळावेगळा वैशिष्ट्य आहे. भंडार यासाठी शेकडो लोकांचे हात रात्रंदिवस आपापल्यापरीने राबत असतात राज्यातील हजारो गावांना एकोप्याचा संदेश देत वर्डी गावाने या सोहळ्यातून एक वेगळी परंपरा जपली. 
     दीडशे क्विंटल गव्हाची बट्टी ही गौऱ्यावर शेकून तयार केलेली असते, महाप्रसादासाठी बट्टी वरण व वांग्याची भाजी महाप्रसाद म्हणून सर्व भाविकांना दिली जाते रात्रभर भजन, आदिवासी नृत्य, भारुड हे दोन दिवस होळी व धुलीवंदन रात्र व दिवस चालू असतात बाबांच्या कृपेने गावावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती चा परिणाम होत नाही त्यामुळे बाबांची कृपा नेहमीच भाविक वर्गावर असते. 
   कर भला सौ हो हो भला ,गुप्त से मुक्त ,प्रकट सो पसारा. ही बाबांची शिकवण व संदेश 
    महाप्रसादासाठी लागणारी केळीची पाने ही मनवेल येथील दादाजी दरबार यांच्याकडून पुरवली जातात, तसेच भाजी साठी लागणारी वांगे अडावद व आजूबाजूची गावातील शेतकऱ्यांकडून पुरवली जातात. 
   यावर्षी भंडाऱ्या साठी जिल्ह्याचे कलेक्टर श्री अभिजीत राऊत साहेब यांना स्वतः मठाधिपती श्री दिवाकर नाथ महाराज यांनी स्वतः जाऊन आमंत्रण दिलेले आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील माजी विधानसभा अध्यक्ष श्री अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सौ.ज्योती राकेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य घनश्याम निंबाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सभापती विनायक चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती कांतीलाल पाटील या सर्वांची उपस्थिती राहणार आहे.
    भंडाऱ्याचे नियोजनासाठी पोलीस पाटील श्री पद्माकर नाथ यांचे नियोजन तसेच अडावद पोलीस स्टेशनचे पीआय किरण दाडगे साहेब व त्यांची टीम यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे. तसेच गावातील सरपंच सौ.ललिता दत्तात्रय पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील तरुण मंडळी, व्यापारी बांधव ,डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन, भजनी मंडळ, या सर्वांचे सहकार्य लाभणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी भंडारा साठी आवर्जून उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मठाधिपती श्री दिवाकर नाथ महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे.
              #॥  असा होणार कार्यक्रम ॥ #
              सकाळी सात वाजता-आरती.
      सकाळी आठ वाजता -मारूती अभिषेक.
      सकाळी नऊ वाजता -समाधी अभिषेक.
    सकाळी दहा वाजता -समाधी पंचामृत स्नान.
      सकाळी अकरा वाजता -होम हवन.
       दुपारी बारा वाजता -मोठी आरती
दुपारी एक ते रात्री बारा पर्यंत -महाप्रसाद(भोजन)
     सांयकाळी सात वाजता-संध्यारती.
    रात्री आठ वाजता -पालखी मिरवणुक.
रात्री नऊ वाजता -भजन, किर्तन,भारूडांचा कार्यक्रम.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp