ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियमचे दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेत घवघवीत यश; तालुक्यात प्रथम... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/03/2022

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियमचे दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेत घवघवीत यश; तालुक्यात प्रथम...

चोपडा (प्रतिनिधी) :--
   चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई बोर्डाशी संलग्नित शाळेचा दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सलग ५ वर्षापासून तालुक्यात विद्यालयाचा विद्यार्थी प्रथम येत असून ही परंपरा यंदाही कायम आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सत्रनिहाय निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
      हर्षदा अनिल सोनवणे ही विद्यार्थिनी ९८.४ टक्के गुण मिळवत विद्यालयात व तालुक्यात प्रथम आली. तर प्रांजल खंडेराव पाटील (९६.८%), चिरायू नितीन पाटील (९४.८%), वेदिका विजय पाटील (९४.४%), प्रणव जितेंद्र चव्हाण (९३.६%) यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले आहेत. तेजस्विनी सुरेश सोनवणे (९२.४%), भावेश मच्छिंद्र सैंदाणे (९०.४%), क्रिष्णा तुकाराम पाटील (९० %) या विद्यालयातील  विद्यार्थ्यांनी शेकडा ९० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. २२ विद्यार्थ्यांना शेकडा ८० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
       यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा सौ.आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, समन्वयक नीळकंठ सोनवणे, प्रा. दीनानाथ पाटील, प्राचार्य ममता न्याती, उपप्राचार्य परमेश्वरी राजकुमार यांनी अभिनंदन केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उज्वला भट, दीप्ती पाटील, जगदीश  पाटील, रुपेश चव्हाण, सादिक शेख, शकील अहमद, जीवन पाटील, अमन पटेल, किरण बडगुजर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp