दिल्लीच्या इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या ऑनलाईन प्रदर्शनात चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील याच्या " द मिटिंग " या चित्राला द माईकल एजेलो पुरस्कार मिळाला .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

26/03/2022

दिल्लीच्या इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या ऑनलाईन प्रदर्शनात चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील याच्या " द मिटिंग " या चित्राला द माईकल एजेलो पुरस्कार मिळाला ....

चोपडा (प्रतिनिधी) :--
    दिल्लीच्या इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या ऑनलाईन प्रदर्शनात चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील याच्या " द मिटिंग " या चित्राला द माईकल एजेलो पुरस्कार मिळाला ....
     दिल्ली येथे आयोजित इंद्रधनुष्य आर्ट वर्ड गॅलरीच्या ऑनलाईन 2022 या चित्र प्रदर्शनाच्या स्पर्धेचा निकाल नुकताच दिनांक 25 मार्च रोजी जाहीर झाला यात विविध राज्यातील सहभागी नामवंत चित्रकारांची निवड झाली आहे. यात चोपडयातील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील याच्या "द मिटिंग" या चित्राला द माईकल एञेलो पुरस्कार जाहीर झाला ... लवकरच त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी पाठविण्यात येणार आहे.या प्रदर्शनात संपूर्ण देशातून जवळ -जवळ 150 नामवंत चित्रकारांनी सहभाग घेतला होता.
    या वेळीं अनिलराज यांनी श्री चे जरा वेगळेच चित्र साकरले होते ...यात  गणेश हे एका पक्षा सोबत बोलताना दिसत   आहेत यात श्री गणेश यांचे नेहमी प्रमाणे जरा वेगळेच चित्र साकारले आहे. या चित्रातुन चित्रकार ने पशु पक्षी व प्राणीमात्रावर वर दया करा असा संदेश आहे... हे चित्र रोटरीग पेन व इक व पेपर यावर केले आहे ...या पूर्वी हि या युवा चित्रकाराच्या चित्रांची अनेकदा अंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे त्या पैकी 2 चित्रांना पुरस्कार मिळाले आहेत ... आता पर्यंत या चित्रकाराने बुद्धीची देवता प्रिय गणेशाची व बलदेवता हनुमानाची चित्र साकारली आहेत ... अनिलराज पाटील हे गेली 15 वर्ष शाडू मातीत घरीच मूर्ती बनवता ... व घरीच मूर्ती चे विसर्जन करता ....... असे त्यांनी आवर्जून सांगितले .                आतापर्यंत अनिलराज यांनी 40 ते 50 चित्र साकारली आहेत ... त्यांना त्याचे गुरु चोपडा चित्रकला महाविद्यालय चे प्रिन्सिपॉल श्री राजेंद्र महाजन व पुण्याचे चित्रकार श्री चंद्र्शेखर कुमावत याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आणि अनिलराज पाटील याच्या परिवारचे आशिर्वाद आहेत. त्यांच्या वर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp