मुक्ताईनगर मधील वडोदा वनपरिक्षेत्रहे महाराष्ट्रामधील एक नंबरवर होते मात्र आता याला नंबरच नाही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे?
मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र 15500 चौरस मीटर मध्ये भोगलीक विस्तार झालेला आहे.पूर्वी 4 टायगर्स म्हणजे(पट्टेदार वाघ) आणि आता सात ते आठ टायगर आहेत. या जंगलामध्ये वाघांचा मुक्त संचार आहे म्हणून याला टायगर्स कॉरिडॉर असा या वडोदा वनपरिक्षेत्र याचा शासन स्तरावर उल्लेख झालेला आहे.या जगंलात अजन, खैर, सादडा, साग, सलई, असे अनेक वृक्ष होते. आता नाममात्र शिल्लक...
वन्य प्राणी पट्टेदार वाघ,बिमट्या वाघ, नीलगाय, सांबर, हरीण, कोल्हे, रान डुकरं, ससे, रान मांजर, तडशे,असे हिंस्क प्राणी होते.पक्षी मध्ये मोर, लाडोर, पोपट, कोयड, घार, गरुड पक्षी, कावडे, बदक पान बुडी बगडे, असे अनेक पक्षी होते
त्या वेळेस घनदाट अर्णय होते जगंलात या सर्व प्राण्यांना व पक्ष्यांना मुबलक वातावरण होते. वृक्षतोड कमी होती.जगंलात जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कारण त्यावेळेस वडोदा वनक्षेत्राला कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल होते. त्यावेळेची वनपरिक्षेत्राधिकारी श्री,डी आर पाटील, श्री,पी आर पाटील, श्री आर जी राणे असे सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले होते.त्यांनी आपल्या कार्यकाळा मध्ये प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून व सूचनांचं नियमाप्रमाणे काटेकोरपणे पालन केले आणि मुख्यालय कधी त्यांनी वाऱ्यावर सोडलं नाही 24 तास त्यांनी आपलं कार्य पाडलेल आहे.मजूर, वन मजूर गार्ड, वनपाल सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांची करडी नजर होती
ते स्वतः जंगलामध्ये फिरायचे आपले कर्मचारी ड्युटी करतात की नाही, जंगलामध्ये आहेत की कुठे बाहेर आहेत याची दररोज खात्री करत होते.आणि एखाद्या वेळेस कर्मचाऱ्यांना दांडी मारली असेल न विचारता निघून गेला असेल कुठे तर त्याला सूचना देऊन कर्तव्य पार पाडण्यात सांगत होते.एकाखांद्या अरबट कर्मचाऱ्यांने व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भरोशावर ड्युटी करत नसेल त्याचा रिपोर्ट किंवा अहवाल वरिष्ठांना सादर करत होते.
त्यामुळे त्यांची वडोदा वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचार्यांवर त्यांचा वचक होता वडोदा वनपरिक्षेत्र मध्ये जो निधी शासन स्तरावरून आला असेल ज्या कामासाठी उपलब्ध झाला असेल त्यांनी स्वतः लक्ष देऊन संपूर्ण कामे करून घेतली अशाप्रकारे त्यांनी वडोदा वनपरिक्षेत्राचे संरक्षण केलेले आहे आणि त्यांना आपला जंगल सुरक्षित ठेवलेला होता.आणि आता तालुक्यातीलच कर्मचारी असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून या वडोदा वनपरि क्षेत्रांमध्ये ड्युटी करीत आहे.शासनाच्या परिपत्रकानुसार तीन वर्षानंतर बदली असते.पण या कर्मचाऱ्यासाठी वअधिकारांसाठी नियम लागू नाही का? या तालुक्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत.म्हणून वडोदा वनपरिक्षेत्र भकास झालेला आहे आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याला जबाबदार कोण?
लोकप्रतिनिधी? की वरिष्ठ अधिकारी? की स्थानिक कर्मचारी अधिकारी?वडोदा वनपरिशेत्र वाचवायचा असेल तर लवकरात लवकर वनक्षेत्र पाल अधिकारी देण्यात यावा अशी मागणी परिसरातील जनतेची आहे.

No comments:
Post a Comment