तावसे बु!! येथील उपसरपंचाची मुजोरी , वृक्षांची काळजी घेणाऱ्या नागरिकास केली शिवीगाळ....
तावसे बस! येथील दूध डेअरी समोर पिंपळाच्या झाडाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सदर पिंपळाच्या झाडाची मुळे मोकळी झाली आहेत. सदर पिंपळाच्या झाडाच्या मुळांची काळजी घेण्यासाठी व संरक्षणासाठी गावातील अशिक्षित पण वृक्षांबद्दल प्रेम बाळगणारा नागरिक शांताराम चौधरी यांनी स्वतः खर्च करून व मेहनत घेऊन माती आणली. सदर मातीद्वारे ते झाडाची मोकळी झालेली मुळे व झाडाला योग्य पाणी देता यावे म्हणून ते मातीचे रिंगण करणार होते . त्याआधीच गावातील जबाबदार व गावाचे उपसरपंच धनसिंग श्रावण चव्हाण यांनी पिंपळाच्या झाडाच्या बाजूला असलेली माती स्वतःच्या खाजगी कामासाठी इतरत्र विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली असता अशिक्षित नागरिक शांताराम चौधरी यांनी त्यांना माती नेण्यास मज्जाव केला असता उपसरपंच धनसिंग श्रावण चव्हाण यांनी अशिक्षित नागरिक शांताराम चौधरी यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. मी गावाचा उपसरपंच आहे. गावाचा प्रमुख आहे. तू मला अडविनारा कोण , अश्लील शिव्या देत मारण्याची धमकी देखील दिली.
वृक्षांचे महत्त्व , वृक्षांची काळजी घेणे हे अशिक्षित नागरिकास समजते पण गावातील जबाबदार व्यक्तीला कळत नाही हि मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
उपसरपंच धनसिंग श्रावण चव्हाण हे गावाच्या प्रत्येक बाबतीत अरेरावी व हम करे सो कायदा करत असल्याचे शांताराम चौधरी यांनी सांगीतले आहे...

No comments:
Post a Comment