अमळनेर आगारातील बससेवा पूर्वपदावर आली. सर्व चालक व वाहक यांची 100% उपस्थिती ... बससेवा सुरु झाल्याने प्रवांशामध्ये आनंदाचे वातावरण
काल पासुन चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आता बस सेवा पूर्णपणे पूर्वपदावर आली असुन, सर्व लांब पल्यांच्या व खेङ्या साठी वेळेवर बस सोडण्यात येत आहे. तसेच उन्हाळी सुट्या असल्यामुळे स्कूल बसेस सध्या बंद आहेत. प्रवांशाचा चांगला प्रतिसाद मिळत असुन प्रवाशांमद्ये आनंदाचे वातावरण आहे.
आज S MARASHTRA 7 NEWS चे अमळनेर तालुका प्रतिनीधी श्री पंकज पाटील यांनी आगर प्रमुख अर्चना देवरे मॅडम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सर्व माहिती दिली.त्यांनी सर्व बसेस चांगल्या आहेत व सर्व कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हे पण सांगितले. तसेच सर्व बसेस आधीच दुरुस्त करुन घेतल्या होत्या. आजपासुन चालकांना बस चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बऱ्याच काळा नंतर कर्मचारी बस डेपो आल्याने कर्मचाऱ्यांमद्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. पूर्णशमतेने काम करून सर्व बस सेवा पूर्व पदावर आणू असे कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविले.
तसेच अमळनेर आगार सर्व प्रकारे सज्ज झाले असून लवकरच सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरु होतील असे आगार प्रमुख अर्चना देवरे मॅडम यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment