आदिवासी वनदावेदारांचे दावे मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरू ... शे.शे.म.प.जिल्हासरचिस संजीव शिरसाठ यांचा इशारा... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/04/2022

आदिवासी वनदावेदारांचे दावे मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरू ... शे.शे.म.प.जिल्हासरचिस संजीव शिरसाठ यांचा इशारा...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     आदिवासी वनदावेदारांचे  दावे मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरू..शे.शे.म.प.जिल्हासरचिस संजीव शिरसाठ यांचा इशारा...
    आदिवासींवर जुलूम संपवा प्रचंड जनसमुदायाने तहसीलदारांना घातले साकडे...
      आदिवासी जमातीवर  स्वतंत्र भारत होऊनही वर्षा नु वर्षे अन्यायाचा पाढा वाचण्यात येत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायाची दारे खुले केल्यावरही परिस्थिती "जैसे थे "अशीच आहे . आदिवासींवरील जुलूम हे दिवसेंदिवस वाढत आहेत.हा जुलूम आता कदापि खपवून घेतला जाणार नाही. आमचे वन दावे तात्काळ मंजूर करण्यात यावेत त्यात कोणत्या संघटना दबाव आणत असतील तो आम्ही हाणून पाडू.आदिवासी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, प्रांताधिकारी, तहसीलदार, वनसंरक्षक, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सामुहिक बैठक लावून वन दावेंचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून जन आंदोलन छेडतील अशा इशारा आदिवासी शेतकरी शेतमजूर पंचायत चे जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ यांनी तहसीलदार यांना निवेदन देतांना दिला आहे यावेळी आदिवासी बंधू भगिनींनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले.
     काल दिनांक १८/०४/२०२२ रोजी अनिल गावित तहसीलदार चोपडा यांना आदिवासी बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. आदिवासिंवर देश स्वातंत्र झाल्यापासून अन्यायच सहन करिता आहेत.आता यापुढे अन्याय सहन करणार नाहीत. काही संघटना अधिकारी यांच्यावर दबाव आणुन आदिवासींना मिळणाऱ्या हक्कांपासु वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे? सन २०१६ चा जि आर मध्ये स्पष्ट म्हंटले आहे फक्त दोन पुवावे उपलब्ध असल्यास वनदावे मंजुर करावेत.परंतु शेकडो वनदावे अपात्र कसे झालेत? का कोणा नेत्याचा दबावात केले तर नाहित ना? असा सुर देखिल जनतेतून उमटला . 
     यावेळी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले त्यात १) आमदार सो लताताई सोनवणे सदस्य वनहक्क समिती महाराष्ट्र राज्य, उपविभागीय अधिकारी अमळनेर, तहसीलदार चोपडा, वनसंरक्षक चोपडा व सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे समवेत वनदावेदांराची बैठकघेण्यात यावी.२)पात्र अपात्र, अंशतः:पात्र, प्रलंबित व नविन दाखल झालेले वनदावेदारांना तात्काळ दुष्काळ निधी सानुग्रह अनुदान मिळावे.३) २०१६ च्या शासन निर्णय प्रमाणे कोणतेही दोन पुरावे च्या आधारे प्रथम अपात्र केलेले दावे मंजूर करण्यात यावे.व अपात्र, प्रलंबित,व नविन दाखल झालेले वनदावे तात्काळ मंजुर करण्यात यावे.४) आदिवासी पाड्यावरिल घरकुल साठी जागा शासनाने उपलब्ध करुन देवुन त्यांना हक्काचे घर मिळावे.५) आदिवासी पाड्यांना गावठाण,व महसुली दर्जा मिळावा.६) काही आदिवासी बांधव ह अशिक्षित असल्याने ते वनदावे दाखल केले नाहीत त्यांचे दावे दाखल करुन घेण्यात यावे व त्यांना वंचित ठेवु नये आहेत त्यांचे वनदावे नविन तात्काळ दाखल करुन स्विकरण्यात यावे.७) अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर हातपंप टाकुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी.८) अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर रस्ते तयार करण्यात यावेत.९) बोरमळी या आदिवासी पाड्याची नविन ग्रा.प.चा प्रस्ताव मंजूर व्हावा१०) उर्वरित आदिवासी पाडे तात्काळ पेसा घोषित करण्यात यावे११) ज्या आदिवासी पाड्यांवर २०/३० वर्षांपासून विजपुरवठा नाही तेथे विज पुरवठा देण्यात यावा.या मागण्यां चे निवेदन देण्यात आले.
      निवेदन देतेप्रसंगी आदिवासी शेतकरी शेतमजूर पंचायत जिल्हा सरचिटणीस संजीव शिरसाठ, देवसिंग पावरा ,प्रताप पावरा सदस्य आ.वि.प्र. यावल,ताराचंद पाडवी,सौ नायजाबाई पावरा, गुडा पावरा,सौ नर्साबाई पावरा,सौ नानीबाई पावरा,बाळा भिल, सुनिल भिल,जिजाबाई पावरा, रेनाबाई पावरा, अलकाबाई पावरा, देवगण पावरा, नामा पावरा,करण पावरा,सायसिंग पावरा, अशोक बटन पावरा, बिराम बारेला, मुकेश बारेला, सुरसिंग पावरा यांचे सह शेंकडों महिला, पुरुष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp