मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारात 'आदर्श युवा' "महाराष्ट्र युथ आयडॉल 2021" ठरलेत चहार्डी गावातील सुपुत्र श्री. मनोहर भिमराव ढिवरे - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/04/2022

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारात 'आदर्श युवा' "महाराष्ट्र युथ आयडॉल 2021" ठरलेत चहार्डी गावातील सुपुत्र श्री. मनोहर भिमराव ढिवरे

चोपडा (प्रतिनिधी) :--
      मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारात 'आदर्श युवा' "महाराष्ट्र युथ आयडॉल 2021"  ठरलेत चहार्डी गावातील सुपुत्र  श्री. मनोहर भिमराव ढिवरे
       चोपडा तालुक्यातील चहार्डी गावाचे सुपुत्र, भगिनी मंडळ संचालित  समाजकार्य महाविद्यालय चोपडा  येथील माजी विद्यार्थी , अवंता फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  श्री. मनोहर ढिवरे यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श युवा "महाराष्ट्र युथ आयडॉल" 2021 या पुरस्काराने नाशिक येथील शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथील सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात  सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार त्यांनी अवंता फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून  केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना देण्यात आला, संस्थेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की,https://avantafoundation000webhostapp.com/ (संस्थेची वेबसाई) अवंता फाऊंडेशन NGO दर्पण (नीती आयोग नोदणी क्रमांक ;- महा 2018 /0207043 असून "अवंता फाउंडेशन   स्वायत्त तत्वावर खालील प्रकल्प सुरु केलेले  आहेत. व त्या नुसार परिसरात कार्य सुरू आहे.
    १)२०१८ पासून   प्रेरणा शालेय किशोरवयीन  मुलामुलींसाठी लैंगिक शिक्षण समुपदेशन /  प्रशिक्षण  प्रकल्प सुरु केला- या माध्यमातून शालेय किशोरवयीन विध्यार्थीना लैंगिक समुपदेशना बरोबरच  शालेय  किशोरवयीन मुलींना  सॅनिटरी पॅड चे वाटप करणे  व मासिक पाळीत पॅड वापराबाबत ची जनजागृतीपर  कार्यक्रम घेत आहोत. (कोविड -19 सदृश परिस्थितीत शाळा बंद असल्यामुळे सदर प्रकल्प काही दिवस स्थगित आहे) 
    2) २०१८  सालापासून  अवंता फाऊंडेशन संचालित  प्रेरणा कौशल्य विकास प्रकल्प - या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोफत कौशल्य शिक्षण व रोगावर उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते (COVID- 19 महामारी च्या अभावी सध्या ते बंद करण्यात आले आहे) 
    3) २०१७ सालापासून  अवंता फाऊंडेशन संचालित गरीब व गरजू प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ":शालेय  विद्यार्थ्यांना प्रकल्पाच्या  माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिली जाते व काही प्रमाणात आर्थिक मंदत ही केली जाते.
    4) तसेच  मार्च २०२० पासून  सुरू असलेल्या Covid-19 आजाराच्या परिस्थितीत अवंता फाऊंडेशन च्या माध्यमातून  जळगाव ,धुळे, नंदूरबार,पालघर ह्या चार जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या गरजू व गरीब  (TB) क्षयरुग्णांसाठी तसेच कुपोषण ग्रास्थ बालकांसाठी  रेशन किट , प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रम सुरु  आहे.  वरील सर्व प्रकल्प/कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत,  या सर्व बाबींची पार्श्वभूमी लक्षात घेता मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या निवड समितीच्या माध्यमातून श्री.मनोहर ढिवरे यांचे कोविड सदृश परिस्थितीत  सामाजिक योगदान पाहता व अवंता फाऊंडेशन संस्थेची प्रगती पाहता त्यांना राज्यस्तरीय आदर्श युवा "महाराष्ट्र युथ आयडॉल" 2021 या पुरस्काराने नाशिकयथे मा.डॉ. जयलक्ष्मी सानीपिना (इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन) तसेच श्री. रमेश आव्हाड साहेब (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे श्री.मनोहर ढिवरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्य निरंतर करत राहीन असा निर्धार करून मनोहर यांनी 2016 साली Master Of Social work (MSW) चे शिक्षण भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयात चोपडा येथे  पूर्ण केले आणि कार्याला सुरवात केली त्याच बरोबर 2017 साली आपल्या आई च्या नावावरून अवंता फाऊंडेशन या  संस्थेची स्थापना करून गरजूंना मदत करत आहेत, भविष्यात अवंता फाऊंडेशन ही सामाजिक संस्था नाव लौकिक मिळवेलच यात काही शंका नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp