अपघात झालेल्या अनोळखी मयत इसमाचे नातेवाईक यांनी ओळख पटवून प्रेत घेऊन जाणे चोपडा शहर पो.नि. अवतारसिंह चौहान व सहकारी यांचे आवाहन ....
सदर इसम याचा दिनांक १७/४/२२ रोजी नागलवाडी तालुका चोपडा येथे रोड अपघात झाल्याने त्यात जखमी झालेल्या इसमास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे दाखल केले असता येथून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे दाखल करण्यात आले होते.त्याच्यावर उपचार सुरू असताना तो दिनांक १९/४/२२ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता तो इसम मयत झाला आहे. त्याचे नाव व गाव माहीत नसून ओळख पटवून आलेली नाही. त्याच्या उजव्या हातावर हरालाल असे नाव गोंदलेले आहे. सदर इसमास व त्याचे नातेवाईकांचा चोपडा शहर पोलीस शोध घेत आहेत. या इसमास व त्याच्या नातेवाईक यांना कोणी ओळखत असेल तर त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशन व शनी पेठ पोलीस स्टेशन जळगाव मोबाईल क्रमांक ९९२३१२११५० यावर संपर्क साधावा. त्या इसमाचे प्रेताची ओळख पटवून येण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे राखून ठेवण्यात आले आहे.
तरीअपघात झालेल्या अनोळखी मयत इसमाचे नातेवाईक यांनी ओळख पटवून प्रेत घेऊन जाणे असे चोपडा शहर पो.नि. अवतारसिंह चौहान , पो.ना.हेमंत कोळी , पो.ना. महेंद्र साळुंखे , पो.कॉ. प्रमोद पवार ,पो.कॉ. मधुरे जितेंद्र सोनवणे व सहकारी यांनी आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment