शासकिय कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्यात भरघोस वाढ ... शासन निर्णयाचे स्वागत.. जगन्नाथ बाविस्कर - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/04/2022

शासकिय कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्यात भरघोस वाढ ... शासन निर्णयाचे स्वागत.. जगन्नाथ बाविस्कर

चोपडा (प्रतिनिधी) :--
     शासकिय कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्यात भरघोस वाढ ... शासन निर्णयाचे स्वागत..जगन्नाथ बाविस्कर
     राज्य शासकिय व इतर पात्र कर्मचार्यांच्या वाहतुक (वाहन) भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यासाठी शासनाने क्रमांक वाहभ-२०२०/प्र.क्र.०३/२०२०/सेवा-५ नुसार दि.२० एप्रिल २०२२ रोजी निर्णय घेतला असुन ह्या शासन निर्णयाचे विशेष स्वागत ग.स.मधील सेवकांच्या (स्टाफ्) सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केले आहे.
    केंद्र शासनाने सातवा वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने ७ जुलै २०१७ व २ ऑगस्ट २०१७ रोजीच्या आदेशान्वये त्यांच्या कर्मचार्यांच्या निवासस्थानापासुन कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरिल खर्चाची भरपाई म्हणुन सुधारित दराने वाहतुक भत्ता मंजुर केलेला आहे.त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम,२०१९ अन्वये राज्य शासकीय कर्मचार्यांना १ जानेवारी २०१६ पासुन सुधारीत वेतन संरचना लागु करण्यातआलेली असुन तेव्हापासुन कर्मचार्यांच्या वाहतुक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.ह्या वाहनभत्ता वाढीच्या निर्णया मुळे राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
.................................................................
     दिव्यांग कर्मचार्यांच्याही वाहनभत्त्यात विशेष वाढ...
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचार्यांसह अंध अस्थिव्यंगाने अधु व कण्याच्या विकाराने पीडीत असणार्या तसेच मुकबधीर,श्रवणशक्तीतील दोष असणार्या दिव्यांग कर्मचार्यांना सुध्दा वेतनश्रेणी नुसार विशेष वाहनभत्ता मिळणार असल्याने त्यांच्याही वेतनात खुप मोठी वाढ होणार आहे.
.................................................................

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp