कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनेत मोहिमे अंतर्गत कर्तव्य करत असतांना मरण पावलेल्या न. पा. कर्मचाऱ्यांच्या वारसाना 50 लाख सानुग्रह अनुदान ....
नगरपरिषद क्षेत्रातील कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी यांना सानुग्रह सहाय्य अनुदान देणेचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. चोपडा नगरपरिषद आस्थापनेवरील मयत कर्मचारी कै.प्रताप माधवराव बाविस्कर, शिपाई यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना मोहिमेत कर्तव्यावर असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने तसेच कै.संजय जिजाबराव साळुंखे, मजुर, पा.पु. विभाग यांचे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 चे संक्रमणामुळे मृत्यू झालेने त्यांचे पात्र वारसांना सानुग्रह सहाय्य अनुदान मिळणेकामी चोपडा नगरपरिषदतर्फे शासनास प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.
चोपडा नगरपरिषदेतर्फे शासनाकडे पाठविलेले उक्त दोन्ही मयत कर्मचारी यांचे प्रस्ताव मंजुर झालेने प्रती मयत कर्मचारी र.रु.50 लक्ष मात्र याप्रमाणे एकूण र.रु.1 कोटी मात्र सानुग्रह सहाय्य अनुदान नगरपरिषदेस प्राप्त झालेले आहे. आज दि.12/04/2022 रोजी मुख्याधिकारी यांचे दालनात मुख्याधिकारी यांचे हस्ते दोन्ही मयत कर्मचारी यांचे वारस नामे श्रीमती हेमलता प्रताप बाविसकर व श्रीमती वैशाली संजय साळुंखे यांना प्रत्येकी र.रु.50 लक्ष मात्र सानुग्रह सहाय्य अनुदानाचे धनादेश वितरीत करणेत आले सदर प्रसंगी माजी नगराध्यक्षा सो., सौ.मनिषाताई जीवन चौधरी, उपमुख्याधिकारी श्री.निलेश ठाकुर, सहा.कार्या. निरिक्षक श्री प्रविण मराठे तसेच चोपडा नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment