राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात संपन्न ..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/04/2022

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात संपन्न .....

चोपडा (प्रतिनिधी) :--
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात संपन्न .....
      भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा यांचे सात दिवसीय लोकसहभागीय ग्रामीण शिबीर अनुदानित आश्रमशाळा, सत्रासेन ता. चोपडा येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी समाजकार्य महाविद्यालय,चोपडा आणि अनुदानित आश्रम शाळा, सत्रासेन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ज्ञानेश्वर भादले हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आश्रमशाळेचे पुरुष अधीक्षक श्री. मनोज महाजन, आणि महिला अधिक्षका सौ.शीतल पाटील हे होते.
    कार्यक्रमाच्या सुरवातीस छञपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा थोडक्यात इतिहास सांगितला.
      प्रा.डॉ.राहुल निकम यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक,शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानावर प्रकाशझोत टाकला. महात्मा जोतीराव फुले हेच शिक्षणमहर्षी असून या महाराष्ट्रातले एकमेव महात्मा असल्याचे स्पष्ट केले. महात्मा फुले यांच्या साहित्याची माहिती उपस्थितांना दिली. प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची गीत गायनातून मांडली आणि त्यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून दिला आणि आजच्या काळातील स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
      या वेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या 15 शिबिरार्थीनी राष्ट्रपुरुषांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. आश्रमशाळेतील 06 विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर भादले यांनी आपले प्रासंगिक मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रमशाळेतील कर्मचारिवृंद यांचे सहकार्य लाभले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौदानकर, उपप्राचार्य प्रा.डॉ. आशिष गुजराथी यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp