चोपडा महाविद्यालयाची रोशनी निकम राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय ...
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची इयत्ता 11 वी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी कु.रोशनी भिकन निकम ही उस्मानाबाद येथील युगप्रर्वतक बहुउद्देशिय सामाजिक फाऊंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. रू 3000/- व स्मृतीचिन्ह असे बक्षिसाचे स्वरुप आहे. त्याबद्दल कु.रोशनी व तिचे पालक यांचा संस्थेचे अध्यक्ष अॕड संदीप सुरेश पाटील , सचिव डाॕ स्मिता संदीप पाटील व कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.डी बी देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डाॕ ए एल चौधरी, उपप्राचार्य प्रा.बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा. एस पी पाटील , प्रा. ए एन बोरसे व पालक श्री भिकन निकम उपस्थित होते.

No comments:
Post a Comment