वडोदा वनपरिक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 571/72मध्ये जेसीबीच्या साह्याने "काळी व पिवळी मातीची अवैध वाहतूक" वन अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2022

वडोदा वनपरिक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 571/72मध्ये जेसीबीच्या साह्याने "काळी व पिवळी मातीची अवैध वाहतूक" वन अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष ...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी
      वडोदा वनपरिक्षेत्र कंपार्टमेंट नंबर 571/72मध्ये जेसीबीच्या साह्याने "काळी व पिवळी मातीची अवैध वाहतूक" वन अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष ...
      अवैध मार्गाने चोरटी वाहतूक सुरु अधिकारीमात्र सुस्त
      भ्रष्टाचारामुळे कारवाई होत नाही यावर कारवाई होणार का कार्यवाही कोण करणार
      कार्यवाही न झाल्यास वाळवंट होणार?
       वनजमिनीवरअतिक्रमण होण्यासाठी नवीन शक्कल लढवण्याचा वन अधिकाऱ्याचा नांदवेल येथे प्रकार ...
    मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्रातील डोलारखेडा नियत क्षेत्रात वनपाल पी टी पाटील यांच्या कार्यक्षेत्रात नादवेल शिवारातील कंपार्टमेंट नंबर 571/72मधील अवैद्य मार्गाने गावाजवळील पूर्ण वृक्ष नष्ट करून जेसीबीच्या साह्याने मोठमोठे खड्डे खोदून  लाखो ब्रास काळी व पिवळी माती ट्रॅक्टर च्यासहाय्याने वाहून नेत असल्याचे चित्र आहे.
    सविस्तर वृत्त असे की नादवेल येथील कंपार्टमेंट नंबर 571/72 मधील गेली 5ते6 महिन्यापासून नागरिक या ठिकाणची काळी व पिवळी माती जेसीबी च्या सहाय्याने खोदकाम करून नेत आहे वनपरिक्षेत्र अधिकारी  व वनपाल आणि कर्मचार्‍यांना वन संपत्ती विकण्याचे अधिकार आहेत का? मग अधिकार नसेल तर मग?  ही काळी पिवळी माती कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या परवानगी देण्यात आली? याला जबाबदार कोण? वरिष्ठ  अधिकारी ? की स्थानिक अधिकारी ? किंवा कर्मचारी? की लोक प्रतिनिधी? अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.वडोदा वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वन संपत्ती विकण्याची शपथ तर घेतली नाही ना? मग हे सर्व प्रकार सुरु का? वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हे माहीत नाही का? मग कारवाईचे मुहूर्त केव्हा निघणार ? कारवाई का होत नाही?  डोलारखेडा नियत क्षेत्रांमधील वनपाल पि,टी, पाटील यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू पिपरी पंचम येथील गिट्टी मुरूम व सुकळी येथील माती व मुरूम नांदवेल येथील काळी पिवळी माती ला ठराविक लोकांसाठी साठी खुलेआम परवानगी दिल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे  वनपाल पि,टी, पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील असल्यामुळे ते नागरिकांनाशी सुपरिचित आहे. नावानिशी नागरीक ओळखत असतात त्यांचा दांडगा संपर्क सुद्धा आहे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जवळकीचे संबंध आहेत म्हणून  हे प्रकार सर्रास सुरू तर ना ?माती वाहून नेले च्या बदल्यात खूप मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे दबक्या आवाजामध्ये जनतेत बोलल्या जात आहे.या प्रकाराला वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर बच्छाव सुद्धा जबाबदार असल्याचे परिसरात नागरिकांच्या चर्चे वरून समजते वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्यास वडोदा वनपरिक्षेत्र वाळवंट होण्याला वेळ लागणार नाही  वृक्षप्रेमी व वन्य प्रेमींचे भाकीत खरे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.या प्रकाराला आळा बसावा अशी परिसरातील वन्यप्रेमी वृक्षप्रेमी ची मागणी पुढे येत आहे.
.......................................................................
    वनपाल पी टी पाटील यांचा करिश्मा महान आहे. जागते रहो !! नादवेल शिवारातील कंपार्टमेंट नंबर 571/72 मधील मधील माती खोदून नेण्याच्या प्रकारामागे जमीन अतिक्रमण करण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. या कंपार्टमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. आणि नागरिक वहिवाट सुद्धा करीत आहेत.कपाशी तूर केळी असे पिक सुद्धा घेत आहे यामधून छप्पर फाडके, वनविभागातील अधिकाऱ्यांना खूप मोठी पैसे कमवण्याची संधी उपलब्ध झालेली असल्याचे बोलले जात आहे.हा प्रकार अर्थपूर्ण व्यवहार झाल्यामुळे संबंधित व्यक्तीला  ही परवानगी वैयक्तिक स्तरावर दिल्या असल्याचे समजते यातील अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमावण्याचा गोरख धंदा सुरू केल्याचे तालुक्यामध्ये  चर्चेला उधाण आले आहे.
.......................................................................

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp