महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2022

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न...

चोपडा (प्रतिनिधी) :---
         महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न...
     महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी , इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गांसाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी , सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. मागील वर्षी कोविड काळात सदर परीक्षा ऑनलाईन पदधतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दुसरी ते सातवीच्या एकूण ४३९ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण १८ ब्लॉक मध्ये करण्यात आले होते. एका बेंचवर एक विदयार्थी या प्रमाणे एका ब्लॉक मध्ये एकूण २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
       केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठानचे उमेश रामहरी इंगळे यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर डी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सागर जाधव , बाळासाहेब पाटील , ज्ञानेश्वर मिस्त्री यांचे सहकार्य लाभले.
       सदर परीक्षेच्या पर्यवेक्षणसाठी प्रताप विद्या मंदिर शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील व प्रा. संजय एस देशमुख यांनी अध्यापक विद्यार्थी उपलब्ध करून दिले.
      परीक्षेचे पर्यवेक्षण प्रियंका गुलाब कोळी , रविता बारेला , लक्ष्मी पावरा , आरूशा पावरा , सुष्मिता पावरा ,मेघा पावरा ,प्रज्ञा चौधरी, मोनिका सरवने ,नेहा वाघ, देवेंद्र वानखेडे, वर्षा धनगर, जयश्री कोळी , राज बारेला, नेहा अहिरे, भाग्यश्री धनगर, लालचंद बारेला, हर्षाली पाटील ,आकांक्षा पाटील आदींनी पर्यवेक्षण केले.
     परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील व मुख्याध्यापक प्रदिप चौधरी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp