उद्या दि.6 जुलै रोजी विटनेर ता. चोपडा येथे श्री कुलस्वामिनी चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळा
उद्या 6 एप्रिल 2022 या तारखेला "विटनेर" ता. चोपडा येथे कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केलेला आहे ,तरी दि.5 जुलै रोजी गुजरात येथील सुप्रसिद्ध भजन गायक योगेशजी जुनेजा यांचा रात्री जागरणात भजनसंध्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच दि.6 रोजी सकाळी 10:35 ला भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल महाप्रसादत मसाल्याची चणाडाळ , पोळी ,भात व बुंदी ठेवण्यात आला आहे.तरी या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास श्री चामुंडा माता मंदिर समिती व विटनेर ग्रामस्थातर्फे सर्व भक्तगणांना आमंत्रित करण्यात आले आहे .आपण ह्या भव्य दिव्य सोहळ्यास सह कुटुंब,सहपरिवार,इष्ट मित्रांसह उपस्थित राहून मातेच दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
कुलस्वामिनी श्री चामुंडा माता प्राणप्रतिष्ठात सहभागी होणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी उद्या सकाळी ६:३० पासून भरली की चालली चोपडा ते विटनेर S. T. सेवा करण्यात आली आहे तरी भाविकांनी या सेवेचा लाभ घेऊन प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याचे साक्षी व्हा... असे आवाहन मंदिर समिती व विटनेर ग्रामस्थांनी केले आहे.

No comments:
Post a Comment