artbeats Foundation Pune आयोजित राष्ट्रीय स्तरावरील चित्रप्रदर्शनात स्टिपलींग मास्टर आर्टिस्ट च्या तीन चित्रांची निवड ...
चोपडा येथील स्टिपलींग मास्टर आर्टिस्ट श्री अनिलराज पाटील यांच्या चित्राची artbeats Foundation Pune आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन चित्रप्रदर्शनात (All India YOUNG ARTISTS' SHOW 2022 साठी ) तीन चित्रांची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात सलग सहाव्यांदा त्यांच्या विविध कलाविष्काराची निवड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी झाली. त्यात हार्मनी इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन , ऑल इंडिया लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर स्मृति चित्रप्रदर्शन , रेनबो आर्ट वर्ल्ड दिल्ली द्वारा आयोजित मेटॅफर , आर्क सिटी , दुबई येथील आर्ट अँड क्राफ्ट फाउंडेशन आयोजित संकट मोचन या जगविख्यात संस्थांच्या प्रदर्शनात निवड झालेली आहे. ह्या व्हर्चुअल प्रदर्शनाचा 15 ते 20 एप्रिल दरम्यान कलारसिकांना लाभ घेता येणार आहे. या कला प्रदर्शनाचे आयोजन विद्यानगरी पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार श्री संतोष पांचाळ यांनी आयोजन केले आहे.
वरील स्पर्धेसाठी त्यांनी पूर्णाकृती मोरगावचा मोरेश्वर , लेण्याद्रीचा गिरीजात्मक आणि आपल्या सर्जनशील कलाविष्कारातून श्री गणेश व पक्ष्याची भेट दाखविणारी ' द मिटिंग ' ही चित्रे साकारली आहेत.
“ या उत्तुंग यशासाठी त्यांची सातत्यपूर्ण कलाराधना बरोबरच पुण्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार श्री चंद्रशेखर कुमावत यांचे मार्गदर्शन लाभले आहे ”, असे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल त्यांचे बाविस्कर परिवार चोपडा व अडावद , मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे व विवेकानंद विद्यालय परिवार , सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था चोपडा चे पदाधिकारी श्री हेमराज पाटील , सौ अश्विनी पाटील , श्री अश्फाक पिंजारी , स्वप्नील नेवे , प्रसिद्ध पेंटर श्री रवी दादा पाटील व सर्व स्तरातून राज्यभरातील चित्रकारांकडून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment