बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे आजादी का अमृत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सलग दोन दिवस उत्साहात साजरा.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

06/04/2022

बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे आजादी का अमृत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सलग दोन दिवस उत्साहात साजरा....

अमळनेर (प्रतिनिधी) पंकज पाटील :--
       बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा येथे आजादी का अमृत महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम सलग दोन दिवस उत्साहात साजरा....
     लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित सी.बी.एस.ई.बोहरा  सेंट्रल स्कूल येथे 75 वा आजादी का अमृत महोत्सव दिनांक 04/04/2022 व 05/04/2022 या दोन दिवशी आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले प्रथम दिवशी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आबासो चिमणरावजी पाटील,  माजी नगराध्यक्ष दादासो चंद्रकांत पाटील, पारोळा न्यायालयाचे न्यायाधीश श्री प्रकाशराव महालनकर साहेब यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.प्रसंगी श्री सौरभ मुनोत चेअरमन अहिंसा पब्लिक स्कूल दोंडाईचा, माधुरी पाटील  चेअरमन विखे पाटील स्कूल शिंदखेडा, मिलिंद पाटील सर प्रिन्सिपल पंकज ग्लोबल स्कूल चोपडा, संदीप वडनेरे सर चोपडा, ज्योती भगत मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका पारोळा, रामदास वाकोडे साहेब पी.आय. पोलीस स्टेशन पारोळा, आदी मान्यवर तसेच श्री अतुलजी मोरे ,श्री गोपाल शेठ अग्रवाल ,श्री.डी . एल. महाजन, श्री प्रवीण शेठ दाणेज, श्री मुकेश चोरडिया, श्री रावसाहेब भोसले सर, श्री संजय शर्मा, संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा,शाळेचे डायरेक्टर श्री प्रकाशजी बोहरा, श्री मुकुंद जी बोहरा ,या मान्यवरांनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली याचबरोबर शाळेचे एस.एम.सी मेंबर, पी. टी. ए. मेंबर व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
      सदर कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती. मागील दोन वर्षापासून कोरोना निर्बंधांमुळे असे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकले नव्हते. ही मरगळ दूर करण्यासाठी शाळा प्रशासनाने ही सांस्कृतिक  संध्याकाळ आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती तसेच भारतातील विविध सण, देशभक्ती या प्रकारच्या मूल्यांचे नृत्य व नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. प्रथम गणेश वंदना हे नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर नर्सरीच्या चिमुकल्यांनी बिल्ली बोली म्याऊ म्याऊ व मेरे प्यारे मामाजी गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली यानंतर मुलींनी नऊवारी साडी नेसून मराठी नृत्य सादर करून महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र मल्होत्रा सर व सौ. जागृती पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात दिनांक 05/04/22 रोजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आबासो चिमणरावाचे पाटील सौभाग्यवती सौ. नलिनी ताई पाटील, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर प्राचार्य श्री. मॅथ्यूअब्राहम सर, सांघवी स्कूल उतरान चे चेअरमन श्री माळी सर, नामांकित ज्येष्ठ वकील देशपांडे दादा, एलआयसी डेव्हलपमेंट अधिकारी श्री मिलिंद भाऊ मिसर, लोकमत पत्रकार व पेटी अध्यक्ष रावसाहेब भोसले सर, देशदूत पत्रकार श्री योगेश पाटील, बोहरांचे जवळचे मित्र श्री दौलत नाना, शाळेचे पीटीए मेंबर सुप्रिया बिऱ्हाडे मॅडम, एडवोकेट अफ्रे मॅडम, लीना चोरडिया मॅडम, मिलिंद पगारे, संदीप धमके, एसएमसी मेंबर सौ मनीषा सोनवणे मॅडम व बीजी पाटील सर, मुकेशजी चोरडिया, संजय शर्मा, एडवोकेट श्री दत्ताजी महाजन, योग गुरु सोनवणे सर  या मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सरूवात झाली.
      दुसर्‍याही दिवशी याच उत्साहाने विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली मल्लखांब कराटे, योगा, रोप मल्लखांब यासारखे साहसी खेळ दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. व छत्रपती शिवाजी महाराज तसेच देशभक्तीपर नाटिका सादर करून प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बागुल सर व किरण पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले व संपूर्ण बोहरा परिवाराने श्री प्रकाशजी बोहरा, श्री मुकुंदजी बोहरा ,आशिष बोहरा, डॉक्टर सोनम बोहरा, आर्किटेक दिव्या बोहरा, श्वेता बोहरा, आशाताई शर्मा , जिजाजी,संजय शर्मा , सर्व बोहरा परिवारातर्फे उपस्थित मान्यवरांचे तसेच पालकांचे आभार मानले .
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य सौ शोभा सोनी मॅडम, ऍडमिनिस्ट्रेटर श्री .वीरेंद्र सखा सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp