अमळनेर येथे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरणात , घर फोडीचे सत्र सुरु , बंद घरावर टार्गेट , नागरिकांना सावधानतेचा इशारा पो. नि. जयपाल हिरे - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/04/2022

अमळनेर येथे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरणात , घर फोडीचे सत्र सुरु , बंद घरावर टार्गेट , नागरिकांना सावधानतेचा इशारा पो. नि. जयपाल हिरे

अमळनेर (प्रतिनीधी ):--पंकज पाटील
    अमळनेर येथे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरणात , घर फोडीचे सत्र सुरु , बंद घरावर टार्गेट , नागरिकांना सावधानतेचा इशारा पो. नि. जयपाल हिरे 
    अमळनेर शहरातील धरणगाव रोड ताडेपुरा भागातातील गंभा रेखा अनिल लांडगे वय ४० राहते बंद पाहून घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे घराचे दरवाजा तोडुन कपाटातील ७ , ९ ४,५०० रुपये किमतीचे एवज त्यात सोन्याचे चांदीचे दागीणे व रोख रुपये असा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला होता .
     त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशनला भाग ५ गुरन ३२३/२०२१ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणेचा गुन्हा दिनांक २ ९ / ०७ / २०२१ रोजी दाखल होता. श्री जयपाल हिरे , पोलीस निरीक्षक , यानां मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सदरचा गुन्हा निलेश विनोद माछरे याने केला असल्याची माहीती मिळाली होती . त्यावरुन पोना मिलींद भामरे यानां सदर संशईतावर पाळत ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या . संशयीत निलेश माछरे याने त्याचे आई व पत्नीचे मदतीने काही सोने विकले आहे तसेच चोरीच्या पैश्यानीं मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात नविन सोने खरेदी केले आहे अशी माहीती मिळाल्याने वरील गुन्हयात निलेश माछरे यास दिनांक ८/४/२२ रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता त्याला मा . न्यायालयाने दिनांक १२/०४/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिला. त्याने सुरत वडोदरा येथील नेमाराम चौधरी या सराफ दुकाणावर काही चोरी केलेले सोन्याचे दागीणे विक्री केल्याची कबुली दिली.
       त्यावरुन सराफ नेमाराम चौधरी यानीं ३० ग्रम वजनाची सोन्याची लगड १,५५००० / - रुपये किमतीची समक्ष हजर केली आहे . तसेच चोरीतील पैसे व सोनाराकडील पैसे एकत्र करुन त्याची आई शितल विनोद कंजर व पत्नी प्रियका निलेश माछरे याचें मदतीने ३,५५,००० / - रुपये किमतीचे नविन सोन्याचे दागिने ए . के . ज्वेलर्स अमळनेर याचेंकडुन बनविल्याचे आरोपी क्रमांक १ याने कबुल केले असुन त्यावरुन नमुद दोन्ही महिला यानां ० ९ / ०४ / २०२२ रोजी सदर गुन्हयात अटक करुन त्याची मा . न्यायालयाने दिनांक १२/०४/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती . त्यानीं देखील गुन्हयाची कबुली देवुन चोरीचे पैश्यातुन नविन विकत घेतलेले सोन्याचे दागीणे पंचासमक्ष काढुन दिले आहेत . या प्रमाणे वरील गुन्हयात आता पावेतो गुन्हयातील चोरी गेलेले सोन्याचे दागीणे पैकी ४,२९ , ४३१ रुपये किमतीचे ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व लगड असा माल हस्तगत करण्यात आला आहे .
    सदर गुन्हयाचा तपास मा . श्री डॉ . प्रविण मुढ़ें सो , पोलीस अधिक्षक जळगाव , मा . श्री रमेश चोपडे सो , अपर पोलीस अधिक्षक , चाळीसगाव , मा . श्री राकेश जाधव सो , उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग याचे मार्गदर्शनाखाली श्री जयपाल हिरे पोलीस निरीक्षक हे करत असुन त्यानां सदर गुहयाचे तपासात पोहेकाँ किशोर पाटील , पोना मिलींद भामरे , पोना , सुर्यकात साळुखे , पोना , सिद्धांत सिसोदे यानीं मदत केली आहे . गुन्हयातील अटक आरोपिंना दिनांक ० ९ / ०४ / २०२२ ते दिनांक १२/०४/२०२२ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मा . न्यायालयाने दिली आहे . तरी नागरिकांनी सावध राहून आपल्या घरादाराची काळजी घ्यावी. पोलीस सदैव जनतेच्या पाठीशी आहे असे पो नि जयपाल हिरे यांनी आमच्या  S महाराष्ट्र 7 न्युज च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp