लासुर येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/04/2022

लासुर येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     लासुर येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न ...
     जिल्हा परिषद मुलांची शाळा लासुर येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगाव च्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नंदलाल माळी हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोरख कुमावत सर हे होते.
      कार्यक्रमाच्या सुरवातीस महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.जितेंद्र महाजन यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्य याबाबत माहिती दिली तसेच सदर स्पर्धा ही विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी केलेले कार्य, दिलेले योगदानाबद्दल माहिती मिळावी हे उद्देश समोर ठेऊन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असे मत मांडले.
      स्पर्धेत शाळेतील इयत्ता ३ व ४ च्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रथम कु. केयुर नंदकिशोर पवार,द्वितीय कु. रोहन नंदलाल माळी, तृतीय कु.उत्कर्ष गुरुदास पाटील हे विद्यार्थी आले असून त्यांना बक्षीस शालेय उपयोगी साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या केलेले सामाजिक, शैक्षणिक, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, बहुजन समाजाप्रती केलेले कार्य आपल्या वक्तृत्वातून मनोगत व्यक्त केले. 
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक किशोर धनगर, कैलास शिंपी, नीता दलाल, सरला निकम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पन्नालाल कोळी व आभार उपशिक्षक सुनील पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp