खान्देश शिक्षण मंडळाचा निकाल घोषित करु नये, सभासदांची मागणी ...
अमळनेर तालुक्यातील सर्वात मोठी आणि जुनी शैक्षणिक संस्था खान्देश शिक्षण मंडळ्याची निवडणुक फ्रेब्रुवारी महिन्यात 8 तारखेला घेतली गेली व नंतर आता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण यावर धर्मदाय आयुक्तांनी खान्देश शिक्षण मंडळाच्या नियम 22 अ ची दुरुस्ती फेटाळल्यांनी निवडून आलेल्या सभासदांची निवड जाहीर करु नये.व नियमाप्रमाणे नव्याने निवडणून घेण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
निवडणुकींचा निकाल घोषीत करण्यासाठी संस्थेने 6 रोजी सभा बोलावली असून नियमाप्रमाणे अजेंडा नाही, अशी तक्रार उमेश साळुंखे, साहेबराव पाटील यांच्यासह 35 सभासदांनी केली आहे. निकाल घोषीत केल्यास उच्च न्यानालय व धर्मादाय आयुक्तांचा अवमान होईल. अशा इशारा देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment