चोपडा महाविद्यालयाची रोशनी निकम राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत द्वितीय ...
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाची इयत्ता 11 वी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी कु. रोशनी भिकन निकम ही बार्शी येथील नालंदा स्तूप बुद्धीझम अॕन्ड रिसर्च ट्रस्ट आणि मागासवर्गीय अल्पसंख्यांक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. रू 2000/- , स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरुप आहे. त्याबद्दल कु. रोशनीचा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. डी ए सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यातआला .याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. एन एस कोल्हे, उपप्राचार्य प्रा.बी एस हळपे , पर्यवेक्षक प्रा.एस पी पाटील , प्रा.संदीप बी पाटील उपस्थित होते.

No comments:
Post a Comment