चोपडा येथील हतनूर पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता प्रकाश पाटील यांची पदोन्नतीवर शिरपूर येथे बदली.
चोपडा येथील हतनूर पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता (स्थापत्य) प्रकाश भीमराव पाटील(पी बी पाटील) यांची पदोन्नतीवर धुळे पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या शिरपूर उप विभागात उप विभागीय अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी चोपडा उप विभागात हतनूर सह अनेर मध्यम प्रकल्पाचीही जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली असून कालव्याद्वारे शेतीला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या लाभक्षेत्रात त्यामुळे वाढ झाली आहे. यासह विविध कामे त्यांनी केली आहेत .पदोन्नतीबद्दल त्यांचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल , शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment