राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निशा पाटील यांना तृतीय क्रमांक ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

21/04/2022

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निशा पाटील यांना तृतीय क्रमांक ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
      राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत निशा पाटील यांना तृतीय क्रमांक ...
      चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल मधील उपशिक्षिका निशा प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे महासंघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. नुकताच अहमदनगर येथे झालेल्या महासंघाच्या राज्य अधिवेशनात त्यांना स्मृतिचिन्ह, गौरवपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत सुमारे तीनशे प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
      'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षकाची भूमिका' या विषयावरील निशा पाटील यांच्या निबंधास गौरवण्यात आले असून महासंघाच्या स्मरणिकेत देखील स्थान देण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना. प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यासोबत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या राज्य अधिवेशनात महासंघाचे राज्य अध्यक्ष कां. रं. तुंगार, सचिव प्रकाश देशपांडे, स्पर्धा परीक्षक बबन पोतदार, प्रमुख व्याख्याते चंद्रात्रे, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निशा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशानिमित्त महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेतील विभाग प्रमुख, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले. निशा पाटील या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापक सुभाष यादवराव पाटील यांच्या स्नुषा आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp