चोपडा ग.स.तर्फे प्रशासक विजयसिंह गवळी यांचा सत्कार.. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2022

चोपडा ग.स.तर्फे प्रशासक विजयसिंह गवळी यांचा सत्कार..

चोपडा(प्रतिनिधी) :--
      चोपडा ग.स.तर्फे प्रशासक विजयसिंह गवळी यांचा सत्कार..
     जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि.जळगाव व ग.स. कर्मचारी हितकारणी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी लेखा परीक्षणाच्या आवश्यक कामकाज पद्धती व संगणक कामकाजासह ग.स.मोबाईल ॲप प्रशिक्षणाचा एक दिवसीय कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी मंडळ प्रमुख विजयसिंह गवळी व प्रशांत विरकर यांचा चोपडा शाखेतर्फे स्टाफ् सोसायटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांच्या शुभहस्ते यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला.
    सत्कारप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक वाल्मीकराव पाटील, लेखापाल श्यामकांत सोनवणे,स्टाफ् सोसायटीचे विद्यमान संचालक नारायण शिरसाठ, चोपडा शाखेचे आनंदराव बोरसे, स्मिता मोरे, दिलीप सपकाळे, शिवाजी बाविस्कर, माधवराव सोनवणे, शरद पाटील,जगन्नाथ बाविस्कर, प्रवीण सत्तेचा, शितल मोरे,सुरेश पाटील,विजय पाटील,उज्वल शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
.........................................................................

    प्रशासकीय कार्यकाळ सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे..
      ग.स.चे प्रशासक विजयसिंह गवळी यांनी आपल्या कार्यकुशलतेने संस्थेच्या अनावश्यक खर्चास प्रतिबंध करून सभासदांच्या कर्जावरील व्याजदर कमी केलेले आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या रक्कमा देणे, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदानाच्या रकमा देणे,थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न करून संस्था नफ्यात ठेवली आहे.म्हणून संस्थेने हा प्रशासकीय कार्यकाळ सुवर्णाक्षरांनी लिहिला पाहिजे.असे चोपडा ग. स.चे उपशाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगितले.
..........................................................................

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp