ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस' जल्लोषात साजरा. - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2022

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस' जल्लोषात साजरा.

चोपडा (प्रतिनिधी) :--
      ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस' जल्लोषात साजरा .....
     चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ इंग्रजी लेखक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांची 23 एप्रिल रोजी जयंती व पुण्यतिथी निमित्त "इंग्रजी भाषा दिवस" विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 
      कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थांनी सादर केलेल्या समुह प्रार्थनेने करण्यात आली. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने स्वतःचा परिचय इंग्रजी भाषेतून करून दिला. इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर असे स्वागत गीत सादर केले. अनोख्या शैलीत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतूनच कथाकथन प्रस्तुत केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री नाट्याचा बहारदार कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. विविध कंपनीच्या उत्पादनाच्या वस्तूंच्या जाहिरातींचे साभिनय सादरीकरण इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थांनी इंग्रजी भाषेत मुलाखतीचे आयोजन केले. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी काळ आणि काळाचे प्रकार या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले.  इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी  मर्चंड ऑफ वेनिस या विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकातील एका प्रसंगाचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
       या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका परमेश्वरी राजकुमार, दीप्ती पाटील, संदीप सोनवणे, अश्विनी पाटील, दिपाली पाटील, प्राजक्ता सोनवणे, सारीका पवार, सुचिता पाटील, माधुरी पाटील व सोनाली देवरे या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सोनवणे, दीप्ती पाटील, अर्चना जैन, अश्विनी पाटील व इयत्ता सातवीचे विद्यार्थी ध्रुवी संदिप पाटील व गौतम आनंद पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्राजक्ता सोनवणे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील,  सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी समन्वयक एन. एस. सोनवणे व डी.एस.पाटील तसेच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.एस.हळपे, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डी.पी.सपकाळे, डॉ.एस.आर. पाटील यांची उपस्थिती लाभली.
      या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp